Medha Kulkarni News Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: माजी आमदार मेधा कुलकर्णींची दबंग कारवाई! छापा टाकत मटका अड्डा केला उध्वस्त| VIDEO

Medha Kulkarni News: पुणे पाषाण भागातील एका मटका अड्ड्यावर मेधा कुलकर्णी यांनी धाड टाकली. या धाडीनंतर पोलिसांना बोलावत त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १३ जानेवारी २०२४

Pune Breaking News:

भारतीय जनता पक्षाच्या(BJP) माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या धडक कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. पुणे पाषाण भागातील एका मटका अड्ड्यावर मेधा कुलकर्णी यांनी धाड टाकली. या धाडीनंतर पोलिसांना बोलावत त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली. मेधा कुलकर्णी यांच्या या धाडसाचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाषाण (Pashan) येथील बालाजी मंदिर चौक परिसरात राजरोसपणे मटका व पाकळी खेळाचा अवैध्य धंदा सुरू होता. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील कारवाई होत नव्हती. त्यामुळे माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकली.

मेधा कुलकर्णींनी थेट त्याठिकाणी व्हिडिओ शुटिंग करत सर्व पुरावे जमा केले व त्यानंतर पोलिसांना बोलावले. माजी आमदार मेधा कुलकर्णी व त्यांचे कार्यकर्ते आल्यामुळे मटका अड्ड्यावरील मटका चालक व खेळणारे यांची धावपळ उडाली व तिथून त्यांनी पळ काढला.

.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मटका अड्ड्यावरील रोख रक्कम, चिठ्ठी चे कागद तसेच अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे. तसेच अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, मेधा कुलकर्णी यांच्या या मोहिमेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. चार वर्षांपुर्वी त्यांनी अशीच धडक कारवाई करत कोथरुड (Kothrud) परिसरातील दारुअड्डा उध्वस्त केला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT