Pune News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Breaking News: ब्रेकिंग! मेट्रोच्या खोदकामात सापडले जिवंत हँड ग्रेनेड; पुण्यात खळबळ

Pune Baner News: पुण्यामध्ये मेट्रोचे काम सुरू असताना हँड ग्रेनेड सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ४ डिसेंबर २०२३

Pune Breaking News:

पुण्यामध्ये मेट्रोचे काम सुरू असताना हँड ग्रेनेड सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांसह बॉंम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. (Pune Baner Breaking News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामध्ये मेट्रोचे (Pune Metro) खोदकाम करत असताना जिवंत हॅन्डग्रेनेड बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली. या परिसरामध्ये आयशर कंपनीच्या आवारात मेट्रोसाठी खोदकाम सुरू होते.

यावेळी दोन जिवंत हॅन्ड ग्रेनेड सापडले. याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. परिसरात स्थानिक पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झालेत. तसेच बॉम्ब शोधक पथकाकडून हे ग्रेनेड ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, बाणेर परिसरात (Baner Area) लोकांची, वाहनांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. अशा वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे जिवंत हॅन्ड ग्रेनेड बॉंम्ब सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बॉम्बशोधक पथकाने हा हँड ग्रेट निकामी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे रायगड मधील समुद्र किनारे हाऊसफुल

Sugarcane Juice Side Effects: उन्हाळ्यात उसाचा रस कोणी पिऊ नये?

HSC Result 2026 : बारावीचा निकाल इतका का घसरला? बोर्डाने सांगितलं नेमकं कारण, वाचा

Business Opportunities After 12th : १२ वी नंतर Business चा विचार करताय? वाचा ५ स्टार्टअप आयडिया, खर्च कमी अन् मोठा नफा

Kideny Health: किडनीचा त्रास आहे? उन्हाळ्यात ही 5 फळे खाण्यापूर्वी 10 वेळा विचार करा

SCROLL FOR NEXT