Pune: पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन; पुण्यातील युवकाला 18 लाखांचा गंडा; युवतीसह भोंदूबाबाचा शोध सुरु

संशयितांचा शाेध घेत असल्याची माहिती हडपसर पाेलीसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.
pune businessman falls for promise of money rain accused looted 18 lakh
pune businessman falls for promise of money rain accused looted 18 lakhsaam tv
Published On

- नितीन पाटणकर

Pune Crime News :

सुसंस्कृत, पुरोगामी पुण्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. पैशाचा पाऊस पडतो म्हणून एका भोंदूबाबाने युवकाचे 18 लाख रुपये पळवले आहेत. हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात पैशाचा पाऊस पडण्याच्या धक्कादायक प्रकाराची नाेंद पाेलीसांत झाली आहे. पाेलीस घटनेची सखाेल चाैकशी करीत आहेत. (Maharashtra News)

कोट्यावधी रुपयांच्या पैशाचे पाऊस पडतो असे सांगत युवकाचे 18 लाख रुपये पळवणारा बाबा आईरा शॉब (Baba Ayra Shab) याच्यासह माधुरी मोरे (Madhuri More), रॉकी वैद्य (Rocky Vaidya) आणि किशोर पंडागळे (Kishor Pandagale) या चार जणांवर हडपसर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune businessman falls for promise of money rain accused looted 18 lakh
Pankaja Munde : मुंडेंच्या परळीत उद्या शासन आपल्या दारी, खासदारांची असणार अनुपस्थिती, पंकजांच्या भूमिकेकडे बीडवासियांचे लक्ष

विनोद छोटेलाल परदेशी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पैशाचा पाऊस पडतो असे सांगून बाबाने एक अघोरी पूजा मांडायला सांगितली. पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही पाेलीस तेथे आले. त्यांनी बाबासह युवकाला मारहाण केली. त्या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पाेलीस पसार झाले. त्यानंतर अन्य लाेकही घटनास्थळावरुन पसार झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पूजेच्या ठिकाणी आलेले पाेलीस हे बनावट हाेते अशी खात्री परदेशी यांची झाली. त्यानंतर हडपसर पोलीसांत त्यांनी धाव घेत संबंधित प्रकाराची माहिती दिली. त्यानूसार या प्रकरणी भोंदू बाबासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा शाेध घेत असल्याचे पाेलीसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

pune businessman falls for promise of money rain accused looted 18 lakh
Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com