Pune News: 'आम्हाला रस्त्यावर आणू नका... भिडे वाड्यातील भाडेकरू आक्रमक; काळ्या ओढण्या घालत नोंदवला निषेध

Pune Bhide Wada News: स्मारकामध्ये जुन्या भाडेकरूंना दुकाने मिळावेत अशी या भाडेकरुंची मागणी आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) भाडेकरूंनी तयार केलेला आराखडा फेटाळला होता.
Pune Latest News
Pune Latest NewsSaamtv
Published On

अक्षय बडवे, पुणे|ता. ४ डिसेंबर २०२३

Pune Breaking News:

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील ज्या वाड्यात सुरु केली होती त्या भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकासाठीचा मार्ग आता मोकळा झाला. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही भिडे वाड्यातील भाडेकरू आक्रमक झाले असून काळ्या ओढण्या घालून त्यांनी महापालिकेला जागा हस्तांतरित करण्यास विरोध केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिडे वाड्याचे (Bhide Wada) जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात होता. स्मारकामध्ये जुन्या भाडेकरूंना दुकाने मिळावेत अशी या भाडेकरुंची मागणी आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) भाडेकरूंनी तयार केलेला आराखडा फेटाळला होता.

तसेच स्मारकाच्या नवीन आराखड्यात कोणतीही दुकाने नसतील, असे स्पष्ट केले होते. या निर्णयाविरोधात भिडे वाड्यातील भाडेकरुंनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी (३, डिसेंबर) महापालिकेला जागा हस्तांतरित करण्यास विरोध करत भाडेकरुंनी निषेध नोंदवला. यावेळी काळया ओढ्ण्या घालत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Latest News
Nashik News: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाचा विराट मोर्चा, पोलिस अन् पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची; नाशिकमध्ये काय घडलं?

"आम्हाला रस्त्यावर आणू नका" अशी विनंतीही जुन्या भाडेकरुंनी सरकारकडे केली. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही जागेची मालकी असलेल्या बॅंकेने अद्याप महापालिकेला सह्या दिल्या नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर संबंधित बॅंकेवर सक्त कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Pune Latest News
Chennai Flood VIDEO : चेन्नईत इतिहासाची पुनरावृत्ती; 8 वर्षानंतर आजच्याच दिवशी शहरात पूर, जनजीवन विस्कळीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com