Pune Ambegaon Latest News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Breaking News: बटाट्याचा पाला खाल्ल्याने विषबाधा! २० गाईंचा मृत्यू; ४० जनावरांची प्रकृती चिंताजनक

Pune Ambegaon Latest News: गाईंना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील आंबेगावमधून समोर आला आहे.

रोहिदास गाडगे

Pune Ambegaon Breaking News:

बटाट्याचा पाला खाल्ल्याने गाईंना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील आंबेगावमधून समोर आला आहे. यामध्ये गीर जातीच्या वीस गाईंचा मृत्यू झाला असून ४० गाईंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील निरगुडसर गावातील शेतकरी  हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांच्या मालकीच्या या गाई आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजस्थान येथील दुग्ध व्यावसायिक हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड हे निरगुडसर (Pune) येथे अनेक वर्षांपासून राहतात. त्यांच्यांकडे अनेक नीर जातीच्या गाई असून त्याच्यावर ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

त्यांच्या शेजारच्या थोरांदळे (Thorandale) गावात बटाटा काढणी सुरू होती. या शेतातील कापून ठेवलेला बटाटयाचा पाला गायींना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर गाईंना विषबाधा झाली. ज्यामध्ये १६ गाई आणि ४ कालवडी अशा एकूण २० गायी मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच ४० गाईंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दुर्घटनेत राजस्थामधील व्यापाऱ्याचे १६- १७ लाखांचे नुकसान झाले आहे. बटाट्यावरील रासायनिक फवारणी,आणि रोगराई मुळे विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत पंचनामे केले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT