pune bopodi land case  Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहारात ट्विस्ट; अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानीला क्लीन चिट, पोलिसांचा युटर्न

pune bopodi land case : पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहारात ट्विस्ट निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानीला क्लीन चिट दिली आहे.

Vishal Gangurde

पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा

एफआयआरमध्ये बोपोडी आणि मुंढवा या दोन वेगळ्या प्रकरणांचा उल्लेख झाल्याने गोंधळ

पुणे पोलिसांनी शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील (अमेडीया कंपनी) यांचं नाव बोपोडी प्रकरणातून वगळलं

बोपोडी जमीन प्रकरणावर उपआयुक्त विवेक मासाळ यांच्याकडून स्पष्टीकरण

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहारात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी युटर्न घेतल्याचे दिसत आहे. बोपोडी जमीन प्रकरणातून शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील (अमेडिया कंपनी) यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे दोघांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलीस स्टेशनमध्ये एकाच एफआयरमध्ये दोन जमीनीचे प्रकरणे नमूद असल्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना अप्रत्यक्ष क्लीन चिट दिली. या प्रकरणावर पुणे पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ यांनी भाष्य केलं आहे.

पुणे पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ यांनी म्हटलं की, खडक पोलिस ठाण्यातील एफआयआरमध्ये बोपोडी जागेची एक घटना आणि मुंढवा मध्ये असलेल्या एका जागेच्या संदर्भात आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. बोपोडी मध्ये ६ आरोपी आणि मुंढवा प्रकरणामध्ये शीतल तेजवाणी आणि दिग्विजय असे दोन आरोपी आहेत'.

'बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील आरोपी नाहीत. एफआयआरमध्ये दोन तक्रारी नमूद आहेत. यातील एकामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे नाव नमूद असल्याने २ प्रकरणाची एक एफआयआर झाली आहे, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

SCROLL FOR NEXT