Pune Bopdev Ghat accident latest news 
मुंबई/पुणे

पुण्यात भीषण अपघात! बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना टेम्पोने चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू

पुण्यातील बोपदेव घाट परिसरात भरधाव आयशर टेम्पो बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला. या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

Akshay Badve

Pune Bopdev Ghat accident latest news : पुण्यातील बोपदेव घाट परिसरात विद्यार्थ्यांना टेम्पोनं चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. तीव्र उतारावरून भरधाव वेगात आलेला आयशर टेम्पो अचानक नियंत्रण सुटल्याने थेट बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरला. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी एका महाविद्यालयाचे आहेत. बोपदेव घाटाच्या तीव्र उतारावरून येत असताना चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेल्या या टेम्पोने आधी एका वाहनाला धडक दिली आणि त्यानंतर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसून पुढे आणखी काही वाहनांनाही जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांनी जागीच प्राण गमावले, तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी आणि पुढील तपास सुरू आहे.

अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटानास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका का झाला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Draping Tips: साडी नेसल्यावर पदर-निऱ्या विस्कटतात? चापून चोपून साडी नेसण्यासाठी फॉलो करा या ७ टिप्स!

Maharashtra News Live Update: अंगणवाडी सेविकांचा रायगड जिल्हा परिषदेत ठिय्या

Nepal Tourism : भाततातून नेपाळला जाण्यासाठी पासपोर्ट की आधार कार्ड काय आवश्यक? नेपाळ प्रवासाचे नियम जाणून घ्या

रेखा कोंडे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी; पुण्यातील मारहाण प्रकरणानंतर पक्षाचा निर्णय

Car & Bike Insurance Rules : सिग्नल तोडणाऱ्यांनो सावधान! आता इन्शुरन्ससाठी मोजावे लागतील जास्त पैसे?

SCROLL FOR NEXT