Pune Pravin Vinod Vaste Death News  Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील भाजपच्या बड्या नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Pune BJP Former Leader Pravin Vaste Death News : पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी पुणे शहर चिटणीस प्रवीण ऊर्फ विनोद वस्ते यांचे वयाच्या ६३व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

Alisha Khedekar

  • पुण्यातील माजी नगरसेवक प्रवीण ऊर्फ विनोद वस्ते यांचे निधन

  • २००२ ते २००७ या काळात त्यांनी लक्ष्मीनगर (पर्वती) परिसराचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले

  • त्यांच्या निधनाने पुण्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

सचिन जाधव, पुणे

राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी पुणे शहर चिटणीस प्रवीण ऊर्फ विनोद कृष्णराव वस्ते (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुणे शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रवीण वस्ते यांनी २००२ ते २००७ या कालावधीत पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले. त्यांनी लक्ष्मीनगर (पर्वती) परिसराचे प्रतिनिधित्व केले होते. नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी परिसरातील विविध नागरी प्रश्न आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या मांडण्याचे काम केले. त्यांच्या कार्यकाळात नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

राजकीय क्षेत्रातही वस्ते यांनी भारतीय जनता पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुणे शहर भाजपचे चिटणीस म्हणून त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामात योगदान दिले. पक्षाच्या माध्यमातून शहरातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. प्रवीण वस्ते यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, भाऊ, बहीण, वहिनी, पुतणे आणि पुतणी असा परिवार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांचे प्रवीण वस्ते हे दीर होते. त्यामुळे त्यांचे पुणे महापालिका तसेच शहराच्या राजकीय वर्तुळाशी असलेले संबंधही जवळचे होते. प्रवीण वस्ते यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वस्ते यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT