Police investigation underway after a hotel worker allegedly murdered a 75-year-old man in Bhor over a mobile dispute. Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यातील भोर हादरलं! जावयाच्या हॉटेलमधील आचाऱ्यानंच केला वृद्धाचा खून, धक्कादायक कारण उघड

Hotel Worker Kills Elderly Man Over Mobile Dispute In Pune: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात धक्कादायक घटना उघड झाली आहे. मोबाईल न दिल्याच्या रागातून हॉटेलमधील आचाऱ्याने ७५ वर्षीय वृद्धाचा खून केला.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे: हॉटेल मालकाने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून कामगाराने थेट मालकाच्या 75 वर्षीय सासऱ्याच्या डोक्यात हत्याराने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. भोर तालुक्यातील जांभळी परिसरात मंगळवारी ( दि. 24) बुधवारी सकाळी 9 वाजता घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसन बाप्पु सुर्वे असं या वृद्धाच नाव आहे. सुर्वे हे त्यांच्या जावयाच्या हॉटेलजवळ टपरी चालवत होते. दरम्यान जावयाच्या हॉटेलमधीलचं एका आचाऱ्याने किरकोळ कारणावरून हा खून केलाय.

फिर्यादी अनिल रसाळ यांचे नसरापूर वेल्हा रोडवर 7/12 शेतकरी व्हेज नॉनव्हेज' नावाचे हॉटेल आहे. सागर थापा हा त्याठिकाणी काम करतो. सागरने रसाळ यांच्याकडे मोबाईल घेऊन देण्याची मागणी केली होती. मात्र ती पूर्ण न झाल्याने त्याने राग मनात धरला. रसाळ हॉटेलमध्ये नसताना त्याने सासऱ्यावर बोथट हत्याराने गंभीर वार केले. या हल्ल्यात सुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सागर थापा घटनास्थाळावरून फरार झाला.

सागर लक्ष्मण कुमार राणा असं 20 वर्षीय आरोपीचं नाव आहे. मोबाईल न घेऊन दिल्याच्या किरकोळ कारणावरून आरोपीने हॉटेल मालकाचे सासरे किसन बाप्पु सुर्वे (वय ७५, सध्या रा. जांभळी, मूळ रा. भोंगवली, ता. भोर) यांचा डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला करत खून केला. पोलिसांनी दोन विशेष पथके तपासासाठी तात्काळ रवाना करून अचूक सापळा रचत आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पुण्यातील कात्रज चौकातून ताब्यात घेतले. या घटनेचा राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

SCROLL FOR NEXT