SHOCKING CHILD GIRL RAPE MURDER CASE IN PUNE BHOR VILLAGE OUTRAGE Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : दगडाने ठेचलं अन...; पुण्यात ४ वर्षांच्या चिमुरडीवर ६५ वर्षीय नराधमाचा बलात्कार, घटनेचा थरार वाचून अंगावर येईल काटा

Pune Bhor 4 year Girl Rape Case Update News : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड. आरोपी अटकेत असून गावात संतापाची लाट उसळली आहे.

Alisha Khedekar

  • नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

  • आरोपी ६५ वर्षीय व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

  • सीसीटीव्ही फुटेजमुळे घटनेचा उलगडा

  • गावात संताप, आंदोलन आणि न्यायाची मागणी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. साडेतीन वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ६५ वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात केल्याची घटना आहे. या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या जगात माणुसकी जिवंत आहे का? तसेच शिक्षणाचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्याचं बिहार होत आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी सुट्टीसाठी नसरापूर येथे आपल्या आजीकडे आली होती. नुकतीच अंगणात दुडू धावणारी तिची पावलं अचानक थांबतील याची कुटुंबाला कल्पना देखील नव्हती. दुपारच्या सुमारास ती राम मंदिर परिसरात खेळत असताना एका ६५ वर्षीय संशयित व्यक्तीने तिला आमिष दाखवून जवळील गोठ्याकडे नेले. त्यानंतर त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता नराधमाने तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

मुलीचा मृतदेह गोठ्यात शेणाने झाकला

यानंतर मुलगी कोणाला सापडू नये म्हणून तिचा मृतदेह शेणाने झाकला आणि आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, मुलगी बराच वेळ घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी तिचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती एका व्यक्तीसोबत जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या दिशेने शोधमोहीम राबवली असता एका गोठ्यात झाकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. ही घटना उघड होताच गावात एकच खळबळ उडाली.

आरोपीला अटक

सदर संशयित व्यक्तीचा शोध घेत असताना तो गावाजवळील नदी परिसरात सापडला. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

ग्रामस्थ आक्रमक

आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत “आरोपी आमच्या ताब्यात द्या” अशी तीव्र भूमिका ग्रामस्थांनी घेतली. ही घटना समाजातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.या घटनेचा निषेध म्हणून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. युपी बिहार सारख्या घाणेरड्या कृत्याच्या घटना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

माणूसकीला काळीमा फासणारी घटना - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी काल पुणे येथे घडलेल्या कृत्याचा फेसबुक पोस्ट करत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, नसरापूर, ता. भोर येथे एका नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून केला. ही घटना अतिशय संतापजनक, मन सुन्न करणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण गृहखात्याला आदेश देऊन या गुन्ह्याचा जलद तपास करण्याच्या सूचना कराव्या. तसेच हा खटला फास्टट्रॅकवर चालवून गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालिकेला भावपूर्ण श्रद्धांजली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : 'या' ५ चुकींमुळे BP मोजताना येते चुकीचे रीडिंग, वाचा रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: हापूसची आवक वाढली; दर घसरले 300 ते 350 रूपये डझनने विक्री

Easy Curd Rice Recipe: सोप्या पद्धतीने अवघ्या १० मिनिटांत बनवा साऊथ इंडियन 'कर्ड राईस', न खाणारेही चाटून पुसून खातील

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना सरकार मोठं गिफ्ट देणार, एकाचवेळी खात्यात खटाखट ₹४५०० येणार? वाचा अपडेट

Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच दिला इलेक्ट्रिक करंट; अपघात दाखवण्याचा कट फसला

SCROLL FOR NEXT