Bhimashankar Temple Saam Tv
मुंबई/पुणे

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Pune Bhimashankar Temple : पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार आहे.

Namdeo Kumbhar

Bhimashankar temple reopening date 2026 : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल ५ महिन्यांनंतर १५ जूनपासून भाविकांसाठी खुले होत आहे. मात्र वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी वेळेची मर्यादा, ऑनलाइन नोंदणी आणि दररोज केवळ एक हजार भाविकांनाच प्रवेश अशी नियमावली लागू करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून दर्शनासाठी सुरू होणार आहे. ९ जानेवारीपासून मंदिर दर्शनासाठी बंद होते. मुख्य मंदिराचे काम बाकी होते त्यामुळे भाविकांची प्रतीक्षा वाढली होती. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सुरू होण्याचा जिल्हाधिकारी यांनी दिलेला ३१ मे चा मुहूर्त हुकला असून आता १५ जूनला मंदिर सुरू होणार आहे.

मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे काम व परिसरातील राडारोड्याची साफसफाई करण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.यामुळे भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना 15 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर व परिसरात तब्बल २८८ कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत.

मुख्य मंदिर सभा मंडपाची पुनर्बाधणीचे काम सुरू असल्याने एक जानेवारीपासून मंदिर दर्शन भाविकांसाठी पूर्णपणे बंद आहे.मुख्य मंदिराचा सभा मंडपाचा पूर्ण भाग काढून पूर्णपणे नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. हे सर्व बांधकाम दगडात असल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी व बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

भीमाशंकर मंदिराचं बहुतेक बांधकाम पूर्ण झालं आहे.सभामंडपाच्या डोमचंही काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचे पायरी मार्गसुद्धा ९० ते ९५ टक्के तयार झाला आहे. याशिवाय मंदिराच्या बांधकामात ८७० पैकी २०० दगडं लावणे बाकी आहे. आता ही सर्वी कामं येत्या १५ दिवसांत पूर्ण करून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्याचं प्रशासनाचं उद्दिष्ट आहे.

- ५ जूनपासून ऑनलाइन नोंदणी सुरू

- https:/shreebhimashankar.com येथे ऑनलाइन नोंदणी करता येईल.

- दररोज एक हजार भाविकांना प्रवेश

- १५ ते ३० जूनदरम्यान सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत दर्शन

- नोंदणीकृत भाविकांसाठी वैध ओळखपत्र बंधनकारक

- ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांना ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT