Pune Bhimashankar Temple Closed Till 3 months saam tv
मुंबई/पुणे

Bhimashankar Temple : भाविकांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपासून भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिन्यांसाठी बंद, पण...

Bhimashankar Temple Closed Till 3 months : भीमाशंकर मंदिराच्या सभामंडप व पायरी मार्गाच्या व्यापक विकासकामासाठी ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी दर्शन सेवा तात्पुरते बंद ठेवणार आहे. महाशिवरात्रीच्या काळात दर्शनासाठी खुला असेल.

Alisha Khedekar

रोहिदास घाडगे, पुणे

या आठवड्यात आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी विविध पर्यटनस्थळी गर्दी केली आहे. मात्र पुढील काही दिवस बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलेले भिमाशंकर मंदिर ९ जानेवारी पासुन भाविकांसाठी बंद रहाणार आहे. मंदिराच्या सभामंडप,पाय-या,आणि परिसरातील विकास कामे सुरु होत असताना भाविकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणुन मंदिर पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पुणे जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी, तसेच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेता २३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि श्री भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वांच्या सहमतीने मंदिर तीन महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप आणि पायरी मार्ग बांधकामासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि भाविकांच्या सोयी करिता महाशिवरात्रीला म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ हा कालावधी यामध्ये वगळण्यात आलेला असून या कालावधीत मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले राहणार आहे.

​या विकास आराखड्यांतर्गत भाविकांच्या सुरक्षितता, सोयी-सुविधा व गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने नवीन व सुसज्ज सभामंडप तसेच पायरी मार्गाचे बांधकाम प्रस्तावित आहे. सदर कामासाठी विद्यमान जुना सभामंडप काढणे आवश्यक असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संरचनात्मक व स्थापत्य स्वरूपाची कामे करण्यात येणार आहेत. कामाचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे आणि कामे नियोजनबद्ध व कालमर्यादित पूर्ण करणे आवश्यक असल्याने मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद ठेवणे अपरिहार्य ठरत आहे.

२०२७ मध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. त्यापूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ २०२५ च्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांकडून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

त्या अनुषंगाने मंदिराची कामे नियोजित कालमर्यादित पूर्ण व्हावीत यासाठी ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर नित्यदर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने घेतला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले असून, भाविकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी भगवान श्री भीमाशंकर यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार व नियोजित वेळेत सुरू राहतील. या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही. बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आज सुट्टी

Pune Accident : हडपसरमध्ये२० वर्षाच्या आदित्यवर काळाचा घाला, पेट्रोल भरून निघताना बसने उडवले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनी eKYC केली तरी डिसेंबरचे ₹१५०० आले नाही; कारण काय?

Pune Traffic Alert: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, आज वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल, वाचा पर्यायी मार्ग

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळणार; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT