PUNE BHIDE BRIDGE CLOSED TILL JULY 6 FOR METRO FOOT OVERBRIDGE WORK; TRAFFIC RESTRICTIONS TO CONTINUE Saam tv
मुंबई/पुणे

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Pune Baba Bhide Bridge Closed Update : पुण्यातील महत्त्वाचा बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पादचारी पुलाच्या बांधकामामुळे हा निर्णय घेण्यात आहे.

Akshay Badve

  • बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

  • डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनलगत पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

  • ७ जुलैनंतरही दररोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार

  • परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे मेट्रोकडून देण्यात आली आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनलगत उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून ते सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन आणि भिडे पूल यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या बांधकामाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामासाठी मोठ्या आकाराचे लोखंडी पिलर आणि इतर महत्त्वाची कामे सुरू करण्यात आली आहे. या कामादरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, ७ जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत बाबा भिडे पुलावरील वाहतूक पूर्णपणे सुरू होणार नसून, दररोज रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत पुलावरून ये-जा करणारी वाहतूक बंद राहणार आहे. दिवसा वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असला तरी रात्रीच्या वेळेत सुरू असलेल्या बांधकामामुळे निर्बंध कायम राहतील.

बाबा भिडे पूल हा डेक्कन, शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ तसेच शहराच्या मध्यवर्ती भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे पूल बंद राहिल्याने वाहनचालकांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः नोकरदार वर्गाच्या कामाच्या वेळेत आणि गर्दीच्या काळात पर्यायी मार्गांचा वापर करणे उपयुक्त ठरेल.

या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन करावे, तसेच आवश्यक नसल्यास गर्दीच्या वेळेत या परिसरात येणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणे अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असून, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखी बळकटी मिळणार असल्याचा विश्वास पुणे मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: तुम्ही खाताय ते पनीर खरे की बनावट? 'या' सोप्या पद्धतीने करा जाणून घ्या

Skin Care: चेहऱ्याला थंडावा आणि नॅचरल ग्लो पाहिजे? मग हा घरी तयार केलेला फेसपॅक नक्की वापरा

Maharashtra News Live Update: शहादा समाज कल्याण वस्तीगृहात 40 विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; आधी कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावणार ट्रेन, कधी होणार लोकार्पण?

Diabetes and Tamarind: रक्तातील साखर कमी करण्यासाठी चिंचेच्या बिया उपयोगी? डॉक्टरांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT