Pune-Banglore Expressway Saam Tv
मुंबई/पुणे

Pune-Banglore Expressway: पुणे-बंगळुरु फक्त ७ तासात; ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे बांधणार; सांगली, मिरजेतून जाणार

Pune-Benglore Expressway Work Update: पुणे-बंगळुरु ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेला पुढच्या महिन्यात मंजुरी मिळू शकते. हा एक्सप्रेस वे सांगली, मिरज या तालुक्यातून जाणार आहे.

Siddhi Hande

पुणे-बंगळुरु एक्सप्रेस वेची मंजुरी अंतिम टप्प्यात

ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बांधणार

सातारा, मिरजमधील या गावातून जाणार

बंगळुरु सध्या आयटी हब बनले आहे. बंगळुरुमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. मुंबई-पुण्यातील अनेक तरुण बंगळुरुमध्ये नोकरीसाठी जातात. दरम्यान, आता पुणे बंगळुरुमधील प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. पुणे बंगळुरु ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेला मंजुरी मिळण्याचे संकेत मिळाले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा देशातील २५ ग्रीनफील्ड महामार्गांमध्ये आधीच समावेश केला आहे. या महामार्गाचे राष्ट्रीय स्तरावर खूप महत्त्व आहे.

केंद्र सरकार सध्या पुणे बंगळुरु एक्सप्रेस वेला मंजुरी देण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या महिन्यात या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या कामासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ सुरु होईल. त्यानंतर बांधकामाला सुरुवात होईल. यासाठी अधिकाऱ्यांनी अंतिम पुनरावलोकनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल आधीच सादर केला आहे.

प्रवासाचा वेळ अर्धा होईल (Pune Bengluru Expressway Travel Time Cut to 7 Hours)

सध्या राष्ट्रीय महामार्गावरुन पुणे ते बंगळुरु प्रवासाला १४ ते १५ तास लागतात. प्रचंड वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे खूप वेळ लागतो. परंतु नवीन द्रुतगती महामार्गामुळे खूप फरक पडणार आहे. आता प्रवासाचा वेळ सात तास होईल. यामुळे तुम्ही खूप लवकरच पुणे ते बंगळुरु टप्पा पार पाडू शकतात.

या जिल्ह्यांचा समावेश

प्रस्तावित महामार्गामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक अधिक जवळ येईल. हा महामार्ग सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमधून जाऊन बेळगावीमार्गे कर्नाटकात जाणार आहे. यानंतर बागलकोट, गदग, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूरमधून बंगळुरुला जाईल.

कांजळे-खोपेगाव येथील प्रस्तावित रिंग रोड द्रुतगती मार्गाशी जोडला जाईल. यामुळे प्रादेशिक संपर्क वाढेल. हा प्रकल्प मुंबई-पुणे-बंगळुरु कॉरिडोरला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. हा प्रकल्प भारतमाला प्रकल्पाचा भाग आहे. ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे अंदाजे ७०० किमी लांब असणार आहे. हा सहा पदरी महामार्ग असणार आहे. काही भागांमध्ये आठ पदरी करता येईल.या प्रकल्पाचा खर्च ४५ ते ५० हजार कोटी अपेक्षित आहे.

सांगलीमधील गावातून जाणार

एक्सप्रेस वे सांगली जिल्ह्यातून जाणार आहे. खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, वायजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक, घोटी खुर्द, हातनोली या गावांवर परिणाम होईल. तासगावमधील कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे या मार्गाचा समावेश आहे.कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव, मालनगाव, हरोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोली, रामपूरवाडी, कोगनोळी या भागातून महामार्ग जाणार आहे. मिरजमधूनही हा मार्ग जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT