Vaishnavi Hagawane Case  saam tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Case: सूनेने आयुष्य संपवल्यानंतर हगवणे कुटुंबाचा बुरखा टराटरा फाटला; पोलिसांकडून सहाव्या दिवशी मोठी कारवाई

Vaishnavi Hagawane Case update : सून वैष्णवीने आयुष्य संपवल्यानंतर पुण्यातील हगवणे कुटुंबाचा बुरखा टराटरा फाटला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहाव्या दिवशी मोठी कारवाई केली आहे.

गोपाल मोटघरे

vaishnavi hagawane news : पुणे जिल्ह्यातील एका राजकीय पुढार्‍याच्या सुनेने गळफास घेत आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील राजकारणात एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व असलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी मुळशी तालुक्यातील भुकूम येथे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याच वैष्णवी हगवणे प्रकरणात नवनवीन खुलासे उघडकीस होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी हुंड्यात दिलेली आलिशान फॉर्च्यूनर कार, अॅक्टिव्हा जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे प्रकरणात धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे, हगवणे कुटुंबीयातील इतर सदस्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणात आता वैष्णवीचा शवविच्छेदन अहवालाचा अहवाल देखील समोर आला आहे. वैष्णवीचा मृत्यू हा मानेभोवती फास लागल्याने झाला. तसेच तिच्या अंगावर धारदार वस्तूने वार केल्याच्या खूप साऱ्या खुणा देखील आढळून आल्या, असं बीजे हॉस्पिटलने दिलेल्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत बावधन पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, आणि सासू आणि नंदेला बेड्या ठोकल्या आहेत. तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर अजूनही फरार आहे. प्रकरणाची दखल आता राज्य महिला आयोगाने देखील घेतली आहे. त्यानंतर पोलिसांनी देखील कारवाईचा वेग वाढवलाय. शशांक हगवणे याला हुंड्यात मिळालेली आलिशान फॉर्च्यूनर कार, अॅक्टिव्हा बावधन पोलिसांनी आता जप्त केली आहे.

वैष्णवी तिच्या कुटुंबीयांना कायमची सोडून निघून गेली आहे. तिच्या पाठीमागे तिचं दहा महिन्याचं चिमुकलं बाळ देखील आहे. आईविना ते बाळ पोरकं झालं आहे. मात्र निर्दयी हगवणे कुटुंबीयांनी तिचा बाळ नेमका कुठे आहे आणि त्याला कोण सांभाळत आहे, याची साधी माहिती देखील वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांना दिली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Eyebrow Hair Loss: भुवयांचे केस विरळ होतायत? शरीर देत असलेल्या गंभीर आजारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Panvel : पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, कस्टमर म्हणून गेले अन्य...

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, सुंदर PHOTOS आले समोर

SCROLL FOR NEXT