Pune class one officer spy camera on wife Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune: क्लास वन महिला अधिकाऱ्याचे आंघोळ करतानाचे VIDEO शूट; पतीनेच बसवले घरात स्पाय कॅमेरा, नक्की प्रकरण काय?

Pune class one officer spy camera on wife: धक्कादायक! पुण्यात अधिकारी पत्नीवर नजर ठेवण्यासाठी क्लास वन अधिकाऱ्यानं घरातच स्पाय कॅमेरा बसवले. दीड लाखासाठी ब्लॅकमेल! गुन्हा दाखल. #PuneNews

Bhagyashree Kamble

राज्यात सध्या अधिकारी आणि राजकारण्यांच्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे खळबळ माजलेली असताना, पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्लास वन अधिकाऱ्याने स्वतःच्या अधिकारी पत्नीवर संशय घेत घरातच स्पाय कॅमेरे बसवले. या कॅमेरांच्या माध्यमातून ते पत्नीवर सतत नजर ठेवत होते. त्यांनी पत्नीच्या आंघोळीचे व्हिडीओ रेकॉर्ड करून मानसिक छळ केला आणि ब्लॅकमेल करत पैसे मागितले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने पतीसह सासरच्या सात जणांविरोधात आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

३० वर्षीय पीडित पत्नीनं आंबेगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०२० साली त्यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर पतीकडून सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. पती वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच शिवीगाळ आणि मारहाण करीत होता. त्यानं घरातील काही ठिकाणी गुप्त कॅमेरे बसवले होते.

ऑफिसमध्ये गेल्यानंतर अधिकारी आपल्या क्लास वन ऑफिसर पत्नीवर नजर ठेवत असे. त्यांनी बाथरूममध्येही स्पाय कॅमेरा बसवला होता. त्यांनी आंघोळीचे व्हिडिओही रेकॉर्ड करून ठेवले होते, असं महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलंय. पती व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांसाठी तगादा लावत होता. गाडी आणि कारचे हप्ते भरण्यासाठी १,५०,००० रूपयांची मागणी केली जात होती.

पत्नीनं नकार देताच पतीनं शिवीगाळ करून पत्नीला बेदम मारहाण केली. याच त्रासाला कंटाळून महिलेनं थेट आंबेगाव पोलीस ठाणे गाठले. तसेच पतीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह, सासू,सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक पुरावे, व्हिडिओ आणि इतर पुराव्यांची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिकांना सन्मान, १६ बीएसएफ जवांनाना शौर्य पुरस्कार प्रदान

Maharashtra Live News Update: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार हक्काचा निवारा

AI Love Story : तरुणी AI चॅटबॉटच्या प्रेमात आंधळी; 5 महिन्यांच्या डेटिंगनंतर गुपचूप उरकला साखरपुडा

Stomach Infection: पोटात इन्फेक्शन असेल तर दिसतात 'ही' लक्षणं

Shocking : २ वर्षांपूर्वी भरती; भाईंदरमध्ये नेमणूक, अवघ्या २४ वर्षांच्या पोलिसानं मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT