Baramati 16 year old girl ended her own life Saam Tv News
मुंबई/पुणे

महाराष्ट्राच्या लेकींना कोणाचा धोका; रस्त्यांवर नेमकं काय घडतंय मुलींसोबत, तुमच्या मुली अजिबात सुरक्षित नाहीत

Baramati 16 Year Old Student Commits Suicide : दुचाकीवरुन येतो, नको त्या ठिकाणी स्पर्श करतो आणि मुलीचा विनयभंग करतो. हे उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये घडत नाही तर महाराष्ट्रात घडलंय.

Snehil Shivaji

स्नेहील झणके, साम टीव्ही

पुणे (बारामती) : शिकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलींच्या अब्रुवर हात घालणारा हा नराधम नीट नीरखून पहा. छत्रपती संभाजीनगरातील बन्सीलाल नगरमध्ये भर रस्त्यात मुलींची छेड काढली जाते. दोन दिवसापूर्वी रस्त्यावरून चालत जाणाऱ्या मुलींची टू व्हीलरवर आलेल्या मुलांनी छेड काढली. हे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सर्रासपणे सुरु असून पोलिस मात्र ढिम्म आहेत.

या घटना इथेच थांबत नाहीत. ज्यांना ही छेडछाड सहन होत नाही. त्या सामाजिक-कौटुंबिक दबावापोटी मृत्यला कवटाळतात. बारामतीतल्या तरूणीसारखं... बारामतीच्या कोऱ्हाळे खुर्द इथल्या १६ वर्षीय मुलीनं ४ गावगुंडांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलंय.

पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असली आणि त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई जरी झाली तरी एक निष्पाप जीव यात गेला. अशा कितीतरी तरूणी अशा नराधमांच्या तालिबानी कृत्याच्या बळी ठरत असतील. मानसिक आघात सहन करत जगत असतील. त्यामुळे आता स्त्रियांनीच अन्याय मुकाटपणे सहन न करता स्वत:ला सक्षम करायला हवं. तर पोलिस यंत्रणेनेही सुस्तपणा सोडून अब्रुवर हात घालणाऱ्या या नराधमांना वेळीच कडक शासन करायला हवं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध, पुण्याच्या बालगंधर्व चौकात आंदोलन

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT