आजोबांचा नादच खुळा; नातीच्या स्वागतासाठी हेलिकॉप्टर!  SaamTvNews
मुंबई/पुणे

आजोबांचा नादच खुळा; नातीच्या स्वागतासाठी हेलिकॉप्टर!

एकीकडे वंशाला दिवा म्हणून मुलाचा हट्ट धरणाऱ्या समाजात स्त्रीभ्रूण हत्येसारखे पाप आजही केले जात असताना, मुलगी जन्मल्याचे मोठे सोहळेही साजरे केल्याचे पाहावयास मिळते.

गोपाल मोटघरे

पुणे : एकीकडे वंशाला दिवा म्हणून मुलाचा हट्ट धरणाऱ्या समाजात स्त्रीभ्रूण हत्येसारखे पाप आजही केले जात असताना, मुलगी जन्मल्याचे मोठे सोहळेही साजरे केल्याचे पाहावयास मिळते. पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या बालवडकर कुटुंबीयांनी त्यांच्या क्रिशिका या नवजात कन्येचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले आहे.

हे देखील पाहा :

आपल्या सुनेला तिच्या माहेरहून नातीसह चक्क हेलिकॉप्टरमध्ये आणून अजित बालवडकर यांनी आपली नवजात नात क्रिशिका बालवडकर हिचे अनोखे आणि जंगी स्वागत केले. अजित बालवाडकर यांची सून अक्षता कृष्णा बालवडकर यांचे माहेर मांजरी फार्म शेवाळवाडी हे असून सून अक्षताला व क्रिशिका या नातीला अजित बालवडकर हे हेलिकॉप्टरमधून बालेवाडीत घेऊन आले.

क्रिशिकाचे आजोबा अजित पांडूरंग बालवडकर यांची इच्छा शाही थाटात आपल्या नातीचे स्वागत करण्याची इच्छा होती. म्हणून सुनेच्या माहेरातून सूनेसह आपल्या नातीला आणण्यासाठी अजित यांनी चक्क हेलिकॉप्टर पाठवले. हेलिकॉप्टर लँडिंगसाठी बालेवाडीतल्या पाटील वस्ती इथे खास हेलिपॅडचे निर्माणही करण्यात आले होते. सून आणि नात घरी आल्यानंतर बालवाडकर कुटुंबीयांनी वाजत-गाजत, फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत स्वागत केले. स्त्रीजन्माचे स्वागत करतानाच स्त्री-पुरुष समानतेचा संदेशही बालवाडकर कुटुंबीयांनी दिला.

घरात मुलगी जन्माला आली की अनेक जण आपली नाराजी व्यक्त करतात, तर काहीजण आपल नाक-तोंड मुरडतात. मात्रा मुलगा - मुलगी अस भेदभाव न करता बालवडकर कुटुंबीयांनी चक्क आपल्या नवजात नातीचे स्वागत हेलिकॉप्टर मधून केले आहे. आमची नातं हीच आता आमच्या वंशाचा दिवा आहे. इथून पुढे तीच आमच्या घराण्याचे आणि वंशाचे नाव वाढवेल, अशा भावना यावेळी बालवडकर कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

SCROLL FOR NEXT