Pune Andekar Gang Saam tv
मुंबई/पुणे

Pune Andekar Gang : आंदेकर टोळीचे पाय आणखी खोलात; व्यावसायिकाकडून उकळली ५.४ कोटींची खंडणी

Pune Andekar Gang News : आंदेकर टोळीचे पाय आणखी खोलात गेलाय. आंदेकर टोळीने व्यावसायिकाकडून ५.४ कोटींची खंडणी उकळली आहे.

Vishal Gangurde

पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीवर नव्याने ५.४ कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल

आंदेकर टोळीकडून व्यावसायिकाकडून 'प्रोटेक्शन मनी' घेतला जात होता.

बंडू आंदेकर आणि मनोज वार्डेकर यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा

आंदेकर टोळीवर आयुष कोमकर हत्या प्रकरणात आणि अनधिकृत बांधकामांप्रकरणी देखील गुन्हे

पुणे पोलिसांकडून आंदेकर टोळीवरील कारवाईचा फास आणखी आवळला जात आहे. पुणे पोलिसांनी आता आंदेकर टोळीवर आणखी नव्याने गुन्हा नोंदवला आहे. आंदेकर टोळीतील लोक गेल्या ८ वर्षांपासून खंडणी उकळत होते. तर पैसे दिले नाही तर व्यावसायिका जीवे मारण्याची धमकी द्यायचे. आदेंकर टोळीने व्यवसायासाठी 'प्रोटेक्शन मनी'च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणी आता सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि मनोज वार्डेकर वर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीकडून खंडणी वसुलीचा हा सगळा प्रकार २०१७ पासून सुरू होता. पुणे शहरात व्यवसाय करत असलेल्या एका व्यावसायिकाकडे आंदेकरने वेळोवेळी "प्रोटेक्शन मनी" च्या नावाखाली खंडणी उकळली. आंदेकर टोळीने फिर्यादीकडून ५.४ कोटी रुपयांची खंडणी उकळली. त्याचबरोबर व्यवसाय सुरू रहावा म्हणून आणखी १.८ कोटी रुपयांची मागणी केली होती.

गेल्या ८ वर्षांपासून सुरू असलेल्या या खंडणीच्या प्रकरणाला वैतागून तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दिली आहे. याआधी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील सदस्यांवर आयुष कोमकर हत्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

तसेच नाना पेठेतील अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे न्यायालयाने आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे आंदेकर टोळीचा पाय आणखी खोलात गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार

LPG Cylinder: सिलेंडरमध्ये 14 ऐवजी 8 किलोच गॅस? युद्धामुळे गॅसटंचाई, सरकारचे कंपन्यांना आदेश?

Grapes Benefits: हिरवी की काळी द्राक्षे? कोणत्या द्राक्षात असते जास्त प्रमाणात असतं व्हिटॅमिन C?

Success Story: १७ वेळा फेल, हार नाही मानली, क्रॅक केली UPSC; ड्रायव्हरचा लेक झाला IPS अधिकारी

Gold Rate Today : एकाच दिवसात सोनं १० हजारांनी स्वस्त, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा

SCROLL FOR NEXT