school bus fare  Saam tv
मुंबई/पुणे

इंधन दरवाढीने पालकांचं बजेट कोलमडणार; स्कूल बसच्या भाड्यात मोठी वाढ

school bus fare hike : इंधन दरवाढीने पालकांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. स्कूल बसच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे.

Vishal Gangurde

स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून पंधरा ते वीस टक्के भाडेवाढ

पुण्यात झाली संघटनेची बैठक

एक जून पासून स्कूल बस ची भाडेवाढ

सागर आव्हाड, साम टीव्ही

पश्चिम आशियात अमेरिका-इराणमध्ये पुन्हा संघर्ष भडक्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संघर्षाचा परिणाम जगातील सर्व देशांवर होत असून सर्वत्र इंधन दरवाढ झाली आहे. भारतालाही इंधनाचे दर वाढले आहेत. या इंधन दरवाढीमुळे पुण्यात स्कूल बसच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भाडेवाढीमुळे पालकांचं बजेट मोडणार आहे.

पुणे जिल्हा शहर आणि पिंपरी चिंचवड येथील स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत पंधरा ते वीस टक्के भाडेवाढ प्रस्तावित केली. त्यामुळे जून महिन्यात सर्व बोर्डांच्या शाळांसाठी सेवा देणारे स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षा चालकांकडून पंधरा ते वीस टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे.

पुणे स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या शेकडो पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. यासंदर्भात राज्य सरकारने चर्चा न केल्यास भाडेवाडीवर ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी लाखो पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. सरकारने जो टॅक्स वाढवलेला आहे, तोही कमी करावा, अशी मागणी पुणे बस असोसिएशनने केलीये.

पालकांवर पडणार आर्थिक भार

दरमहा ५ हजार रुपये बस फी असल्यास त्यात सुमारे ५०० ते ५५० रुपयांची वाढ होणार आहे. काही भागात प्रति किलोमीटर १०० रुपयांपर्यंत भाडेवाढ करण्यात आली आहे. स्कूल बस आणि व्हॅनच्या भाड्यात सरासरी १० ते १५ टक्क्यांची वाढ नोंदवली. काही ठिकाणी हे दर २५ टक्क्यांनी वाढले.

तत्पूर्वी, इंधन दरवाढीमुळे स्कूल बस व्यवसायावर दिवसेंदिवस खर्चाचे ओझे वाढत आहे. ‘ॲड ब्लू’, डिझेल, आरएफआयडी, सीसीटीव्ही आणि कर्मचारी खर्चामुळे वाहतूक सेवा टिकवणे अवघड झाल्याचे सांगण्यात येत आहे. या आधी २० लिटर ‘ॲड ब्लू’साठी १३०० रुपये खर्च येत होता. आता तोच खर्च २००० रुपयांच्या घरात पोहोचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT