Pune airport Two police constables steal 56 bed sheets  Saam TV News
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे विमानतळावर पोलिसांची चिंधीचोरी; विक्रेत्याचे ५६ बेडशीट पळवले, परत देण्यासाठी दोघांनी...

Pune Crime News : पोलीस दलातील पोलीस शिपाई अशा पद्धतीने चिंधीचोरी करत बेडशीट पळवणाऱ्या धक्कादायक प्रकाराकडे गृहविभाग लक्ष देणार का? हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील विमानतळावर पोलिसांची चिंधीचोरी चव्हाट्यावर आलीय. विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या विमान नगर परिसरातील दत्त मंदिराजवळ बेडशीट विकणाऱ्या बेडशीट विक्रेत्याचे ५६ बेडशीट दोघा पोलिसांनी पळवले. पळवलेले बेडशीट परत देण्यासाठी दोघा पोलिसांनी १४ हजार रुपये बेडशीट विक्रेत्याकडून घेतले. परंतु ५६ बेडशीट परत न करत दोघांनी केवळ ३७ बेडशीटच विक्रेत्याला परत केले.

सुनील कुसाळकर आणि संजय अस्वले या दोघा पोलीस शिपायांनी चिंधीगीरी करत बेडशीट विक्रेत्याचे बेडशीट पळवल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलीस रस्त्यावर चिरीमिरी घेत असल्यास आपण अनेकवेळा पाहिलंय. परंतु पोलीस स्टेशनच्या खाकी वर्दीतील या दोघा पोलीस शिपायांनी थेट चिंधीचोरपणा करत एका गरीब बेडशीट विक्रेत्याकडून बेडशीट पळवल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस दलातील पोलीस शिपायांना चांगला पगार असून, हा पगार या पोलिसांना पुरत नाही का? या दोघंही पोलीस शिपायांनी थेट बेडशीट विक्रेत्याला हप्त्यासाठी त्यांचे बेडशीट पळविण्याच्या घटनेमुळे पुण्यात एकच चर्चा रंगली आहे.

पोलीस दलातील पोलीस शिपाई अशा पद्धतीने चिंधीचोरी करत बेडशीट पळवणाऱ्या धक्कादायक प्रकाराकडे गृहविभाग लक्ष देणार का? हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दोन्ही चिंधीचोर पोलिसांची पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असून या दोघाही चिंधीचोर बेडशीट पळवणाऱ्या पोलीस शिपायांची पगारवाढ आता पोलीस खात्याने रोखून धरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

Maharashtra Live News Update : चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT