Air India Express Flight Saam Tv
मुंबई/पुणे

Air India Express Flight : मोठा अनर्थ टळला; एअर इंडियाचं विमान हवेत घिरट्या घालू लागल; नेमकं कारण काय ?

Pune Airport : पुणे विमानतळावर धावपट्टीवर आलेल्या कुत्र्यामुळे भुवनेश्वरहून येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला जवळपास ५७ मिनिट उशिराने लँडिंग करावं लागलं. धावपट्टी मोकळी झाल्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरले, सर्व प्रवासी सुखरूप आहेत

Alisha Khedekar

विमानाच्या लँडिंगला आणि टेक ऑफ करण्यासाठी वातावरणामुळे उशीर होणे अशी कारण आपण नेहमीच ऐकतो. मात्र पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर आलेल्या श्वानामुळे भुवनेश्वरहून येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला ५७ मिनिट उशिराने लँडिंग करावी लागली.ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे धावपट्टीवर येणाऱ्या भटक्या प्राण्यांचा आणि उड्डाण मार्गावर अडथळा निर्माण होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाने २८ जून रोजी सायंकाळी ४ वाजता भुवनेश्वरहून उड्डाण केले आणि सायंकाळी ६.१५ वाजता पुण्यात उतरणार होते. मात्र, विमान उतरण्याच्या तयारीत असताना वैमानिकांना विमान सुमारे १०० ते १५० फूट उंचीवर असताना धावपट्टीवर एक कुत्रा दिसला. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ने तातडीने विमान उतरवण्याची प्रक्रिया थांबवली. धावपट्टी मोकळी होईपर्यंत विमान आकाशातच ठेवण्याची सूचना पायलटला देण्यात आली होती. ग्राउंड स्टाफने कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढले, त्यानंतर विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. अखेर, विमान सुरक्षितपणे उतरले, जरी वेळापत्रकापेक्षा जवळजवळ एक तास उशिरा विमान उतरले असले तरी प्रवासी सुखरूप होते.

विमानाच्या उशीरा लँडिंगमुळे बरीच गैरसोय झाली असली तरी, प्रवाशांना अखेर सुरक्षितपणे उतरवण्यात यश आले. विमान कंपनीने अद्याप या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

अशीच घटना १३ फेब्रुवारी रोजी पुणे विमानतळावर घडली होती. पुणे विमानतळावर धावपट्टीवर विमान उड्डाण घेत असताना धावपट्टीवर आलेला कुत्रा विमानाला धडकून त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे विमानाचे उड्डाण थांबवावे लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

SCROLL FOR NEXT