Pune Hit And Run Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : पुण्यात हिट अँड रनचा थरार! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने उडवलं

Pune Hit And Run Accident News : पुण्यातील पाषाण रस्त्यावर एनसीएल इन्स्टिट्यूटसमोर झालेल्या हिट अँड रन अपघातात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७३ वर्षीय आशा पाटील यांचा मृत्यू झाला. कार चालक घटनास्थळावरून फरार असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात पाषाण रस्त्यावर हिट अँड रनची घटना

  • मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७३ वर्षीय महिलेचा मृत्यू

  • चारचाकी वाहन चालक अपघातानंतर फरार

  • वाढत्या रस्ते अपघातांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात अपघाताची सत्र कायम सुरूच आहेत. अशातच पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. या दुर्घटनेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर घटना पुण्यातील पाषाण रस्त्यावरील एन सी एल इन्स्टीट्यूटसमोर घडली आहे. आशा पाटील असं अपघातात मृत्युमुखी झालेल्या महिलेचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशा पाटील या नेहमीप्रमाणे सकाळी ६.३० व्हायच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी पाषाण भागातील एन सी एल समोर त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एका चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेत त्यांचा डोक्याला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला असून महिलेच्या कुटुंबियांना या बाबत माहिती देण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे .

या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावर न थांबता घटनेनंतर फरार झाला आहे. पोलीस या बेशिस्त कार चालकाचा शोध घेत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रस्ते अपघातामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

Padma Awards 2026 Announcement: पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कुणाचा होणार सन्मान? कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार, वाचा

Shivaji Maharaj Indian Navy history: छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचे जनक का म्हटलं जातं?

Border 2 फेम दिलजीत दोसांझचं स्किन-हेअर रूटीन; पुरुषांनी नक्की करा फॉलो

Shocking: २ बायकांमध्ये नवऱ्याचं विभाजन, एकीसोबत ३ तर दुसरीसोबत ३ दिवस राहणार; रविवारी तरुणाला मिळणार सुट्टी

SCROLL FOR NEXT