Saswad Bypass Flyover Accident: Speeding Brezza Rams Tractor-trolley, Three Seriously Injured 
मुंबई/पुणे

Pune Accident: सासवड बायपासवरील उड्डाणपुलावर भीषण अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉलीला कार धडकली

Car And Tractor-Trolley Accident : पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड बायपासवरील आंबोडी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर चालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • आंबोडी उड्डाणपुलावर कार आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात भीषण अपघात

  • भरधाव वेगातील मारुती ब्रेझा कारने मागून ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक दिली.

  • या अपघातात ट्रॅक्टर चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सासवड बायपासवरील आंबोडी उड्डाणपुलावर भरधाव वेगातील मारुती ब्रेझा कारने मागून ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक दत्तात्रय शिवाजी पवार (रा. पवारवाडी) तसेच ब्रेझा कारमधील योगेश वाघमोडे (रा. फुरसुंगी) आणि अथर्व बांदगर (रा. उरुळी देवाची) हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ब्रेझा कार रस्त्यावरच अडकल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. सुमारे दीड तास वाहतूक विस्कळीत राहिली. दरम्यान, वाहने सेवा रस्त्याने वळविण्यात आली. अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : रखडलेली कामे पूर्ण होणार, ६ राशींच्या व्यक्तींनी घ्या विशेष काळजी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

एकविरा देवीच्या दर्शनासाठी कल्याणहून गेलेल्या भाविकांना स्थानिकांकडून मारहाण; संतापजनक घटना

Badlapur Tourism : पावसाळ्यात वन डे ट्रिप प्लान करताय? बदलापूर ठरेल परफेक्ट, नक्की फिरा 'ही' ५ सुंदर ठिकाणे

Maharashtra News Live Update: दोडामार्ग घोटगेवाडी पुलावरून मुलगा व महिला वाहून गेली

Kidney Damage: किडनीच्या आरोग्यासाठी वरदान आहे ‘हे’ फळ! रोज खाल्ल्याने विषारी घटक बाहेर पडून किडनीचे कार्य सुधारेल

SCROLL FOR NEXT