Pune Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

Pune Bike And Tanker Accident: पुण्यामध्ये भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये टँकरच्या चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यातील वानवडीमध्ये भीषण अपघात

  • भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली

  • टँकरच्या चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू

  • चालकाला पोलिसांनी अटक केली

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये पाण्याच्या टँकरच्या धडकेत फुटबॉलपटूचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक अपघाताची घटना घडली. भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये टँकरच्या चाकाखाली आल्यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातल्या वानवडी परिसरात ही घटना घडली. या अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. वानवडी बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी टँकर चालकाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी परिसरात पुन्हा एकदा टँकरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. गंगा सॅटेलाईट परिसरातील नाल्यावरच्या पुलाजवळ हा अपघात झाला. पाण्याच्या टँकरच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली आल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव ग्रासीया डोरा (वय २४ वर्षे) असे होते. ही तरुणी वानवडीतील नॅन्सी टॉवरमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होती. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांन या अपघातप्रकरणी टँकर चालक संतोष मोर्या (वय ४५ वर्षे) याला अटक केली. आरोपी टँकरचालक बिहार आहे. अपघातानंतर टँकर चालक स्वतःहून वानवडी बाजार पोलिस चौकीत हजर झाला. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सारिका शिर्के यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात निष्काळजीपणामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील क्लाऊड ९ परिसरात अशाच प्रकारच्या अपघातात १९ वर्षीय फुटबॉलपटू तरुणाचा मृत्यू झाला होता. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे वानवडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून टँकर वाहतुकीवर कडक नियंत्रण आणण्याची मागणी वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्स सेवन करणारे 300 पेक्षा अधिक जण पुणे पोलिसांच्या रडावर|VIDEO

Air India : एअर इंडियाचा प्रवास महागला, तब्बल ₹२६००० हजारांपर्यंत तिकीट वाढले, नवे दर कधीपासून?

ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार, मुख्यमंत्र्यांकडून गेमचेंजर प्रकल्पाचे शुभारंभ, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Maharashtra News Live Update: भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT