Pune Accident update  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यात भरधाव कारने १२ जणांना उडवलं; अपघातातील जखमींची यादी आली समोर,वाचा

Pune Accident update : पुण्यात भरधाव कारने १२ जणांना उडवल्याची घटना घडलीये. या अपघातातील जखमींची नावे समोर आली आहे.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

Pune Accident : पुण्यातील भावे हायस्कूलजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुण्यात भरधाव कारने १२ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. अपघातातील जखमी झालेल सर्वजण हे एमपीएससीचा अभ्यास करणारे उमेदवार आहेत. हे सर्वजण चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते. या अपघातीतील जखमींची नावे समोर आले आहेत.

पुण्यात टपरीवर चहा प्यायला उभे असलेल्या १२ जणांना भरधाव कारने उडवल्याची घटना घडली. या अपघातात एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना भरधाव कारने कारचालकाने उडवले. जयराम शिवाजी मुळे असे आरोपी चालकाचे नाव आहे. दिगंबर यादव शिंदे आणि राहुल गोसावी असे इतर सहप्रवासी आहेत. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

अपघातातील जखमींची नावे समोर

अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदिप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

या अपघातातील तिघांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर नऊ जणांना टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात चार विद्यार्थ्यांचे पाय मोडले आहेत. भावे हायस्कूलजवळ हा संपूर्ण प्रकार घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सदाशिव पेठ परिसरात स्पर्धा परिक्षांचे क्लासेस असल्याचे राज्यातील अनेक भागांतून विद्यार्थी या ठिकाणी एमपीएससीची तयारी करण्यासाठी येतात. या परिसरात असलेल्या चहाच्या टपरीवर विद्यार्थी आले होते. त्यांनाच कारचालकाने उडवले. या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुण्यातील युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी शिंदे यांची बातचीत विद्यार्थ्यांशी करून दिली. यावेळी जी मदत लागेल, ती मदत आम्ही करू, असं आश्वासन शिंदे यांनी दिलं. तर आमदार हेमंत रासने यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधून काही मार्ग काढून या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का? असा प्रश्न केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत विचार करू असं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT