Pune Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! ५ वर्षांच्या चिमुकल्याला भरधाव कारने चिरडलं, थरारक VIDEO व्हायरल

Pune Accident CCTV: पुण्यामध्ये सोसायटीच्या पार्किंगमध्ये ५ वर्षांच्या चिमुकल्याला कारने चिरडले. या अपघातामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

Summary:

  • पुण्यामध्ये भयंकर अपघात झाला

  • कारने सायकल चालवणाऱ्या चिमुकल्याला चिरडलं

  • अपघातामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये ५ वर्षांच्या चिमुकल्याला कारने चिरडले. पुण्यातील लोणी काळभोरमधील ही घटना आहे. चिमुकला सोसायटीच्या पार्किंगमध्ये सायकल चालवत होता. त्याचवेळी भरधाव कारने त्याला चिरडले. या अपघातामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरार सीसीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणी काळभोर भागातील एका जॉय नेस्ट सोसायटीमध्ये ही घटना घडलीय पाच वर्षांचा मुलगा हा सोसाटीमधील पार्किंगमध्ये सायकल चालवत होता. अचानक त्याच ठिकाणाहून जात असलेल्या भरधाव कारच्यासमोर आल्यामुळे आणि चालकाला तो समोर न दिसल्यामुळे कारची त्याला धडक बसली. गाडीचा वेग जास्त होता. त्यामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. कारच्या चाकाखाली चिरडला गेल्यामुळे चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

निष्कर्ष आश्वत स्वामी (वय ५ वर्षे) असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत निष्कर्षचे वडील आश्वत नारायण स्वामी (वय ४० वर्षे) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर कार चालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्वत स्वामी यांचा मुलगा निष्कर्ष याला घेऊन सासू सरस्वती रेड्डी या सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सोसायटीच्या आवारात आल्या होत्या. सोसायटीच्या आवारात निष्कर्ष खेळत होता. त्यावेळी त्याठिकाणावरून जाणाऱ्या कारने त्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या निष्कर्षला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

निदा खानला आश्रय देणं भोवलं; एमआयएमच्या नेत्याच्या घर आणि ऑफिसवर चालणार बुलडोझर|VIDEO

SCROLL FOR NEXT