Pune Accident Saamtv
मुंबई/पुणे

Pune Accident: संसार सुरु होण्याआधीच मोडला! देवदर्शनाला जाताना रिक्षा विहिरीत कोसळली; नवदाम्पत्यासह तिघांचा मृत्यू

Saswad Jejuri Road Rickshaw Accident: या अपघातात मृतांमध्ये दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवदांपत्याचाही समावेश आहे.

Gangappa Pujari

Pune Saswad Accident News:

पुणे जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सासवड - जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे रिक्षा विहरीत पडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. दुर्देवी बाब म्हणजे मृतांमध्ये दोन दिवसापूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहित दांम्पत्याचाही समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील (Pune) धायरीहून जेजुरीच्या (Jejuri) खंडोबाच्या देवदर्शनाला निघालेली रिक्षा विहिरीत पडल्याने एका तरुणीसह नवदांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सासवड - जेजुरी (Saswad -Jejuri Road) पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे हा दुर्देवी अपघात घडला.

सोमवार ( २५, सप्टेंबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा दुर्देवी अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी व्यायामाला आलेल्या तरुणांना विहिरीतून वाचवा, वाचवा असा आवाज आला. यावेळी त्यांनी विहिरीत पाहिले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती तात्काळ सासवड पोलिसांना देवून रिक्षासह दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात मृतांमध्ये दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवदांपत्याचाही समावेश आहे. संसाराची सुरूवात होण्यापुर्वीच असा दुर्देवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT