CCTV Footage Saam TV
मुंबई/पुणे

CCTV Footage : रस्ता ओलांडताना दुचाकीची जोरदार धडक; पुण्यातील मगरपट्टा रस्तावरील अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Pune Accident CCTV VIDEO: समोर येणाऱ्या दुचाकीची त्याला जोरदार धडक बसली. व्हिडीओमध्ये तुम्ही देखील पाहू शकता की, हा व्यक्ती पहाटेच्यावेळी भरधाव वेगात वाहने येत असताना देखील रस्ता ओलांडत आहे.

Ruchika Jadhav

Pune News:

मृत्यू कधी आणि कसा ओढावेल याचा काहीच नेम नाही. आपलं आरोग्य चांगलं रहावं म्हणून अनेक व्यक्ती सकाळी किंवा मग पहाटे चालण्यासाठी घराबाहेर पडतता. मात्र पुण्यात मॉर्निंगवॉक करणे देखील जोखमीचे झाले आहे. कारण आज पहाटे मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा भीषण अपघात झाला आहे.

सदर अपघाताची घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्यातील मगरपट्टा रस्तावरून एक पादचारी जात होता. त्यावेळी समोर येणाऱ्या दुचाकीची त्याला जोरदार धडक बसली. व्हिडीओमध्ये तुम्ही देखील पाहू शकता की, हा व्यक्ती पहाटेच्यावेळी भरधाव वेगात वाहने येत असताना देखील रस्ता ओलांडत आहे.

रस्ता ओलांडताना वाहतुकीच्या नियमांचे पालन पादचाऱ्यांनी देखील केले पाहिजे. मात्र इथे हा व्यक्ती ते नियम मोडताना दिसत आहे. रस्ता ओलांडत असताना सुरुवातीला एक चारचाकी समोर येते. त्यातून हा व्यक्ती पुढे निघतो. तितक्यात समोरून एक दुचाकी येते. दुचाकी भरधाव वेगात असते. अचानक समोरून हा व्यक्ती आल्याने दुचाकीला ब्रेक मारणे कठीण होतं.

दुचाकी वेगात आहे असं दिसत असून देखील आपण धावत रस्ता करू शकतो असं या व्यक्तीला वाटतं. मात्र दुचाकी आणि त्याची जोरदार धडक होते. दुचाकी वेगात असल्याने हा व्यक्ती रस्त्याच्या कडेला फेकला गेलाय. त्यासोबत दुचाकीवरील अन्य दोन व्यक्ती देखील खाली पडल्यात.अपघातात पादचारीगंभीर जखमी झालाय. ज्ञानोबा ढबळे असे जखमीचे नाव असून आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढली; रजिस्ट्रेशन कसं कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवऱ्याची क्रूरता... बेदम मारहाण करत बायकोच्या गुप्तांगामध्ये घातले 10 इंच ब्लेड

Saturn transit: त्रिग्रही योगात शनीचं गोचर; पुढचे 6 महिने 3 राशी कमावणार बक्कळ पैसा

Paneer Tikka Masala Recipe: घरी अचानक पाहुणे आलेत? जेवणासाठी टेस्टी करायचं आहे? मग झटपट बनवा पनीर टिक्का मसाला

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये आज अचानक इंधनाचा तुटवडा, जवळपास 80% पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT