Pune Hit And Run Case:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात! मद्यधुंद टेम्पो चालकाने दांपत्याला चिरडलं; मनसे पदाधिकाऱ्याची पत्नी जागीच ठार

Pune Hit And Run Case MNS Leader Wife Death : टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे यांच्या पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाला असून स्वतः श्रीकांत अमराळे गंभीर जखमीा झाले आहेत.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ९ सप्टेंबर

Pune Accident News: पुणे शहरामध्ये अपघातांचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. काल रात्री पुण्यामध्ये एका मद्यधुंद टेम्पो चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत अनेकांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामध्ये ५ ते सहा जण गंभीर जखमी झाले होते. याबाबत आता एक महत्वाची अपडेट समोर आली असून टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे यांच्या पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाला असून स्वतः श्रीकांत अमराळे गंभीर जखमीा झाले आहेत.

पुण्याच्या कोथरुड भागातील करिश्मा चौकात एका मद्यधुंद टेम्पो चालकाने अनेकांना धडक दिल्याची घटना घडली होती. रात्री अकराच्या सुमारास पौड फाटा इथं हा अपघात झाला होता. यामध्ये सहा ते सात जण जखमी झाले होते. अशातच या दुर्घटनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले आहेत तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आशिष पवार हा टेम्पो चालक दारू पिऊन टेम्पो चालवत होता. कोथरूडमधील करिश्मा चौकात त्याने काहींना धडक देऊन जखमी केले. त्यानंतर तसाच पुढे टेम्पो चालवत सिग्नलला उभ्या असलेल्या अमराळे दांम्पत्याला धडक दिली ज्यात गितांजली अमराळे यांच्या अंगावरून टेम्पो गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथं असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आशिष पवारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, पिकअप चालक हा दारुच्या नशेत होता. सुरुवातीला त्याने कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात आधी दोन लहान मुलांना उडवले. इतक्यावरच तो थांबला नाही. त्याने सुसाट पिकअप चालवत पौड फाटा येथील सावरकर उड्डाण पुलाजवळील सिग्नल तोडला. त्यानंतर त्याने मनसे पदाधिकारी दांपत्याला धडक दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anushka Sen : अनुष्का सेनचा बॅकलेस गाउन लुक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसर मध्ये बॉम्ब असल्याच्या बातमीने उडाली खळबळ

Vaibhav Taneja Tesla : एलोन मस्क यांच्या अमेरिका पार्टी'मध्ये मोठी जबाबदारी पार पाडणारे वैभव तनेजा नेमके कोण?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद; गोपीचंद पडळकरांची टीका करताना जीभ घसरली|VIDEO

Politics: भाजप मेलाय, त्यांनी मविआतून उरबडवे घेतले; उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर तिखट वार

SCROLL FOR NEXT