Pune Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News: फूड डिलिव्हरी करण्यासाठी गेला अन् वाटेतच काळाने घाला घातला; भीषण अपघातात २ ठार

Accident News: फूड डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना राहुल मित्रासोबत दुचाकीवरुन निघाला. यावेळी दोघांच्याही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक जण जागेवरच ठार झाला.

Ruchika Jadhav

Pune:

पुण्यातील अपघाताच्या घटना थांबता थांबत नाहीत. सोमवारी देखील रात्री ११.३० पुण्यात एक भीषण अपघात झाला. दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने २ जण जागीच ठार झालेत. तर एक जण किरकोळ जखमी आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुणे नगर महामार्गावर सोमवारी रात्री ११.३० वाजता बकोरी फाट्याजवळ हा अपघात झाला. रावसाहेब सिदाजी माने ( वय 21, रा. रामनगर, लोणीकंद ) व राहुल मोहन डुकले ( वय 19, रा. गोरे वस्ती, वाघोली ) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. रावसाहेब हा फूड डिलिव्हरी करण्याचे काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

फूड डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना राहुल मित्रासोबत दुचाकीवरुन निघाला. यावेळी दोघांच्याही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक जण जागेवरच ठार झाला. तर राहुलला रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर राहुलच्या मागे बसलेला तरुण किरकोळ जखमी झालाय. रावसाहेबच्या मागे आईवडील, विवाहित बहीण असा परिवार आहे.

शिर्डीहून परतणाऱ्या साईभक्तांच्या कारला समृद्धी महामार्गावर अपघात

समृद्धी महामार्गावर देखील कारचा अपघात झाला आहे. अपघातात कारमधील 7 जण जखमी झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पोहाजवळ लोकेशन 190 वर हा अपघात झाला आहे.

कारसमोर अचानक रोही आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीये. गाडीसमोर रोही आल्याने चालकांना गाडीचा अचानक ब्रेक मारला. त्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि थेट डिव्हायडरला जाऊन धडकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारतीय कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

SCROLL FOR NEXT