ST Bus Accident Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या; १५ प्रवासी जखमी

ST Bus Accident Pune: पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

Alisha Khedekar

  • ताम्हिणी घाटात दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या

  • या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले

  • जखमींना तातडीने पौड ग्रामीण रुग्णालयात दाखल

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. चाचिवली गावाजवळ दोन महामंडळाच्या बस समोरासमोर धडकल्या असून या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी साधारण नऊच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे–कोलाड महामार्गावरील हा रस्ता वळणदार आणि घाटातील असल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक मानला जातो. विशेषत: गणेशोत्सवाचा काळ असल्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन–बीड ही एसटी बस कोकणातून पुण्याकडे येत होती, तर चिंचवड–खेड ही एसटी पुण्याहून कोकणाकडे जात होती. ताम्हिणी घाटाजवळील एका तीव्र वळणावर श्रीवर्धन–बीड बसच्या चालकाचा अचानक गाडीवरचा ताबा सुटला. ब्रेक नीट लागला नाही आणि बस डोंगराच्या कडेला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याच क्षणी समोरून चिंचवड–खेड एसटी बस येत होती आणि दोन्ही गाड्यांची जोरदार धडक झाली.

अपघातानंतर तात्काळ स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी आणि महामार्गावरील इतर वाहनचालक मदतीला धावून आले. त्यांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून तातडीने पौड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार सुरू आहेत आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गणेशोत्सव काळात पुणे–कोकण मार्गावरील ताम्हिणी घाट, मुंबई–गोवा महामार्ग अशा अनेक मार्गांवर प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. ताम्हिणी घाट हा निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी वळणदार रस्ते, मुसळधार पावसामुळे ओले व घसरडे डांबरीकरण आणि वाहनांची वाढती गर्दी यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. अशा वेळी चालकांनी सावधगिरी बाळगणे आणि प्रवाशांनीही दक्ष राहणे आवश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांची मागणी; ओबीसी नेते आक्रमक

Shocking : पायात सँडल घातली, अन् घात झाला; विषारी सापाच्या दंशाने इंजिनीअरचा मृत्यू

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा नवा जीआर काढणार? मसुद्याला अंतिम रूप देण्याच्या हालचाली

IBPS RRB Vacancy: सरकारी नोकरीची संधी! बँकेत लिपिक ते PO च्या १३,२१७ पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज

TET Exam : टीईटी गैरप्रकाराचा धसका; आता शिक्षकांची चारित्र्य पडताळणी होणार, VIDEO

SCROLL FOR NEXT