pune news Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह; कल्याणीनगरमध्ये अपघातात तरुणाचा मृत्यू

Pune Acciddent : पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हने पुन्हा एक बळी घेतला आहे. कल्याणीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.

Akshay Badve

पुण्यातील 'टोईट' रेस्टॉरंट बाहेर ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे भीषण अपघात

भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू, परिसरात खळबळ

पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या प्रकारात वाढ

घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरू, चालकाबाबत पुढील कारवाई सुरु

पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हचे प्रकार थांबेना झाले आहेत. वर्षभरानंतर पुण्यातील कल्याणीनगर भागातील 'टोईट' रेस्टॉरंटच्या बाहेर भीषण अपघात झाला. ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील 'टोईट' रेस्टॉरंटच्या बाहेर झालेल्या भीषण अपघातात व्हॅले पार्किंग असिस्टंटचा अपघाती मृत्यू झाला. सत्येंद्र मंडल असे मृत्यू झालेल्या व्हॅले पार्किंग असिस्टंटचे नाव आहे. अपघातानंतर नशेत धुंद असलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रताप असे मद्यधुंद चालकाचे नाव आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत संपूर्ण अपघाताचा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणीनगर भागात "टोईट" नावाचे एक रेस्टॉरंट आहे. दुपारच्या सुमारास मंडल हा याच रेस्टॉरंटमध्ये व्हॅले पार्किंग असिस्टंट म्हणून काम करतो. या पार्किंगमध्ये दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वाहनाने या रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये एन्ट्री केली. काही समजायच्या आत हे वाहन थेट व्हॅले पार्किंग काउंटरवर जाऊन धडकले. या ठिकाणी असलेल्या मंडल याला सुद्धा या वाहनाने उडवलं.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंडल याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण यात त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसानी अपघातस्थळी दारूच्या नशेत असलेल्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघातानंतर येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी झाला होता पोर्शे कारचा अपघात

पुण्यात काही महिन्यांपूर्वी ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना घडली होती. या भीषण अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पोर्शे कार चालवणारा हा अल्पवयीन होता. या अपघाताची चर्चा संपूर्ण देशभर झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast growth stages: स्तनांची वाढ नेमकी कधी थांबते?; प्रत्येक महिलेला माहिती असायलाच हवं, जाणून घ्या तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Rahul Shewale : राहुल शेवाळेंच्या पत्नीकडून मतदारांना साडी वाटप? संतप्त महिलांनी जाळून टाकल्या; पाहा VIDEO

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्यामागे ११,००० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Maharashtra Live News Update: चाळीसगाव नगरपरिषद निकालानंतर उमेदवाराच्या घरावर दगडफेक

Samantha Ruth Prabhu : पाय लटपटले, पदर ओढला; समांथा रुथ प्रभू चाहत्यांच्या गर्दीत अडकली, पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT