Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ८ जणांचा मृत्यू

Pune- Bangalore Highway Accident: पुण्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरू हायवेवरील नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यात नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरचा भीषण अपघात

  • कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर आग लागली

  • अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी

  • अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

पुण्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला. भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक देत पेट घेतला. या भीषण अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलाजवळ सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुणे- बंगळुरू महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव कंटेनरने दुसऱ्या कंटेनरसह अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातानंतर कंटेनरने पेट घेतला. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन कंटेनरच्या मध्ये एक कार अडकली आहे. या कारमधील प्रवाशांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले. अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झोली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाकडून कंटेनरला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या अपघातानंतर पुणे- बंगळुरू महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Chilli Recipe: घरी हॉटेलसारखी कुरकुरीत आलू चिली कशी बनवायची?

ठाकरेंचा पराभव जिव्हारी, मोदींचा राजीनामा; बंटी पाटलांचा कौतुक करत घेतला मोठा निर्णय

Solapur Result: काँग्रेसचा बालेकिल्ला नेस्तनाबूत, मिळाली फक्त १ जागा; सोलापूरवर भाजपचा झेंडा, कारणं काय?

छत्रपती संभाजीनगरमध्ये इतिहास घडला! भाजपची एकहाती सत्ता; MIM ला अनपेक्षित यश, शिंदेंना मोठा धक्का

Capsicum : हिरव्या, लाल आणि पिवळ्या शिमला मिरचीमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT