ACB, Bribe, Pune, Ganesh Jagtap, Akshay Marne
ACB, Bribe, Pune, Ganesh Jagtap, Akshay Marne Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : 3 लाख रुपयांच्या लाच प्रकरणी युवक काॅंग्रेस प्रदेश महासचिवासह एकास अटक; पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ

Dnyaneshwar Choutmal

Pune Bribe Case : पोलिस निरीक्षकासाठी तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी (Bribe For Police Inspector) केल्याने पुण्याच्या एसीबीने (Pune ACB) दाेघांना अटक केली आहे. एसीबीने अटक केलेल्या पैकी एक जण युवक काॅंग्रेसचा (youth congress) प्रदेश महासचिव आहे. या कारवाईची पुण्यातील राजकीय वर्तुळात जाेरदार चर्चा सुरु आहे (Breaking Marathi News)

याबाबत मिळालेली माहिती अशी अक्षय सुभाष मारणे (Akshay Subhash Marne) आणि गणेश बबनराव जगताप (Ganesh Babanrao Jagtap) (राहणार सासवड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनूसार अक्षयला लाच मागणीस गणेश जगताप याने मदत केली.

त्यामुळे दाेघांवर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जगताप हा पुण्यातील सासवड (Saswad) येथील एका राजकीय नेत्याचा चुलत भाऊ आहे. त्यामुळे या कारवाईची जाेरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT