Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune : अध्यात्मिक शिक्षणाच्या नावावर विद्यार्थिनीचं शारीरिक शोषण, आळंदीच्या आश्रमातील धक्कादायक प्रकार

Alandi ashram case : आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक शिक्षणाच्या नावाखाली १२ वर्षांच्या विद्यार्थिनीचे शारीरिक व मानसिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Namdeo Kumbhar

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Alandi ashram minor girl exploitation case : देवाची आळंदी येथील एका खासगी आश्रमात अध्यात्मिक शिक्षण देण्याच्या नावावर एका विद्यार्थिनीचा चक्क शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १२ वर्षाच्या मुलीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे आळंदीत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी नांदेडमधील मुखेड येथील आहे. आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले भाऊसाहेब बोडके हे आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत आध्यात्मिक शिक्षण देण्याचं काम करतात.

भजन -कीर्तन असं आध्यात्मिक शिक्षण देण्याच्या नावावर एका बारा वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थिनींकडून महाराजांच्या पत्नीने आपले हातपाय रात्री बारा एक वाजेपर्यंत दाबून घेतले आहेत. तसेच तिच्याकडून घरातील धुनी भांडी आणि झाडू पोछा असे घरकाम देखील करून घेतले आहेत. या प्रकरणात नांदेड जिल्ह्यातील एका घरकाम करणाऱ्या महिलेने नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस स्टेशन येते भाऊसाहेब माधवराव बोडके महाराज आणि त्याची पत्नी आशाताई बोडके या दोघा पती पत्नी विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

आळंदीतील या खासगी शिक्षण संस्थेत नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एका कुटुंबाने आपल्या दोन चिमुकल्या मुलींना व कीर्तनाचे शिक्षण घेण्यासाठी पाठवले होते. त्यासाठी भाऊसाहेब बोडके महाराज प्रत्येक मुलीच्या शिक्षणासाठी पीडितेच्या कुटुंबीयांकडून 41 हजार रुपये वार्षिक शैक्षणिक शुल्क देखील आकारात होता. मात्र भजन कीर्तनाचे शिक्षण देण्याऐवजी महाराजांच्या पत्नीने त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनींकडून स्वत:ची धुनी-भांडी सारखे घरकाम करून घेतले. तसेच हातपाय रात्री बारा-एक वाजेपर्यंत चोपून घेतले आहेत.

पीडित मुलीसोबत होत असलेल्या अत्याचारामुळे ती मानसिक तणावाखाली गेली आहे. पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांकडे आपल्यासोबत होत असलेले अत्याचाराबाबत सांगितले. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी मुखेड पोलिसांकडे धाव घेत भाऊसाहेब बोडके आणि त्याची पत्नी आशाताई बोडके या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय कायदा 2015 नुसार गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक सोशल करणाऱ्या महाराज आणि त्याच्या पत्नी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या शिक्षण संस्था त्वरित बंद करण्यात याव्या अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कराडमधील टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात मोठी पाण्याची गळती

IAS Transfer : राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर; ८ बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली, कुणाची कुठे नियुक्ती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सची ताकद आणखी वाढणार; स्टार खेळाडूची संघात एन्ट्री

Dhurandhar 2 Collection : रणवीर सिंह बॉक्स ऑफिसचा किंग; 'धुरंधर २' ने ९ व्या दिवशी ७०० कोटींचा टप्पा ओलांडला, जगभरात किती कमावले?

Ashok Kharat : 'झुंबरची लाइट बंद म्हणजे...'; अत्याचार करण्यासाठी अशोक खरात वापरायचा कोडवर्ड, खळबळजनक माहिती समोर

SCROLL FOR NEXT