पुणे: 1.2 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला... (पहा व्हिडीओ) सागर आव्हाड
मुंबई/पुणे

पुणे: 1.2 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला... (पहा व्हिडीओ)

पुण्याच्या रविवार पेठ मधील एका ज्वेलर्सच्या दुकानात मुंबईहून दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाकडील तब्बल १ कोटी २० लाख रूपये किंमतीचे सुमारे ३ किलो सोन्याचे दागिने दोन महिलांनी एक लहान मुलासह लांबविले आहेत.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे: पुण्याच्या Pune रविवार पेठ Ravivar Peth मधील एका ज्वेलर्सच्या दुकानात मुंबईहून दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाकडील तब्बल १ कोटी २० लाख रूपये किंमतीचे सुमारे ३ किलो सोन्याचे दागिने दोन महिलांनी एक लहान मुलासह लांबविले आहेत. ही घटना शनिवार दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास राजमल माणिकचंद आणि कं. ज्वेलर्स सराफ दुकानात घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली. तर चोरीच्या घटनेचा पोलीस युध्दपातळीवर तपास करीत आहेत. तर चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजवरून त्या महिलांचा शोध घेणं सुरु आहेत.

व्हिडीओ-

फरासखाना पोलिस ठाण्यात जिग्नेश नरेश बोराणा (वय 33, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेची खातरजमा करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बोराणा आणि मुकेश चौधरी हे मुंबईहून Mumbai पुण्यात दागिने विक्रीसाठी आले होते.

झालं असं की, ते रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानात गेले. दरम्यान, तेथे एक दागिन्यांची पेटी होती. त्यामध्ये सुमारे १ कोटी २० लाख रूपये किंमतीचे ३ किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते. त्या दोन महिलांनी ती सोन्याचे दागिने असलेली पेटी पळवली. बोराणा यांच्या हा प्रकार लक्षात आला असताना त्यांची भंबेरी उडाली. दरम्यान, या चोरी प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या गुन्हयाचा तपास फरासखाना पोलिस करीत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

SCROLL FOR NEXT