MHADA News 
मुंबई/पुणे

MHADA : म्हाडा कार्यालयात पैशांचा पाऊस, आंदोलक महिलेने अधिकाऱ्याच्या दालनात उधळल्या नोटा

Mumbai MHADA : मुंबईतील म्हाडा कार्यालयात चक्क पैशांचा पाऊस पडला. आंदोलक महिलेने म्हाडा अधिकाऱ्याच्या दालनात पर्समधील पैसे उधळले. त्यानंतर मात्र वांद्रे येथील कार्यलायत एकच गोंधळ उडाला.

Namdeo Kumbhar

संजय गडदे

MHADA News : सामान्य मुंबईकरांना स्वस्तात घर देण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून म्हाडा करत आहेत. मात्र याच महाडा कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलक महिलेकडून पैसे उधळण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर सदर महिलेला म्हाडा कार्यालयात कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांनी बाहेर काढले. मात्र, हा गौडबंगाल आहे तरी काय, अशी चर्चा म्हाडात रंगली आहे.

मुंबईतील वांद्रे पूर्व कलानगर परिसरात म्हाडाचे मुख्यालय आहे. या मुख्यालयात मुंबई मंडळासह कोकण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ अशी म्हाडाची विविध कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज दोन ते अडीच हजार नागरिक हे आपल्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येत असतात.

शुक्रवारी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी एक आंदोलन महिला दुसऱ्या मजल्यावरील एका अधिकाऱ्याच्या कार्यालयात आली. कार्यालयात प्रवेश करताच महिलेने उपस्थित अधिकाऱ्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी करत असतानाच तिने आपल्या पर्समधील नोटा अधिकाऱ्याच्या दालनात उधळल्या. महिलेने पैसे उधळले, त्यावेळी मात्र अधिकारी आपल्या दालनात उपस्थित नव्हता. त्या ठिकाणी असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना हा प्रकार काही समजून आला नाही.

दरम्यान, अधिकारी उपस्थित नसल्यामुळे महिलेने सोबत आणलेल्या पैशाचा हार अधिकाऱ्याच्या दालनाच्या दरवाजाला घातला. या प्रकारानंतर म्हाडाच्या सुरक्षारक्षकांनी आंदोलक महिलेला ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक महिला आक्रमक झाली जर मला कोणी हात लावला तर मी म्हाडाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीव देईल, अशी धमकी दिल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर म्हाडा मुख्यालयातील महिला सुरक्षा रक्षकांनी या महिलेची समजूत काढून तिला म्हाडा कार्यालयाबाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT