badlapur news update Saam tv
मुंबई/पुणे

महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

badlapur news : महानगर गॅसच्या कार्यालयात वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक झाला. त्यांनी थेट अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा दिला.

Mayuresh Kadav

बदलापुरातील महानगर गॅसविरोधात धडक

वाढीव बिलांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब

बिलं दुरूस्त करा, अन्यथा काळं फासू – अविनाश देशमुख

बदलापुरातील महानगर गॅस अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला. सुरूवातीला पोलिसांनी देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांना कार्यालयात जाण्यापासून रोखल्यानं देशमुख आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमही उडाली.

गेल्या काही दिवसांपासून बदलापुरातील नागरिकांमधून महानगर गॅसच्या वाढीव बिलांबाबत तक्रारी येत आहेत. या तक्रारींचं निवारण करण्याऐवजी अधिकारी ग्राहकांशी उद्धटपणे वागत असल्याचे प्रकारही समोर आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी धडक मोर्चा काढत महानगर गॅस कार्यालय गाठलं आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला.

अधिकाऱ्यांच्या दालनात येण्यापासून पोलिसांनी त्यांना रोखल्यामुळे याठिकाणी बराच वेळ शाब्दिक चकमकही उडाली. अधिकाऱ्यांच्या या दादागिरीचा त्यांनी निषेधही केला. तसच वाढीव बिलांमध्ये दुरूस्ती न केल्यास पुढच्या वेळी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासू असा थेट इशारा यावेळी देण्यात आला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख म्हणाले, 'बदलापूरकरांना महानगर गॅसचे भरमसाट बिल येत आहे. आम्ही कार्यालयात येत असल्याने पोलिसांना बोलवण्यात आलं. महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून दादागिरी करण्यात येत आहे. कार्यालयात बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत. महानगर गॅसची शहरातील २-३ हजार लोकांच्या तक्रारी आहेत. तक्रारी देण्यासाठी आलेल्या लोकांना चुकीची वागणूक दिली जाते. जिथे ८०० रुपये यायला हवं, तिथे ८ ते १० हजार बिल येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : दुष्काळावरून फडणवीस-उद्धव ठाकरे आमनेसामने, कोण काय म्हणालं? पाहा व्हिडिओ

PF चे नियम बदलले, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होणार का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: विहिरीत अडकलेला बिबट्या पिंजऱ्यात आला अन् क्षणात सटकला

India : भारतातील अनोखं गाव! पर्यटकांना इथल्या वस्तूंना, लोकांना हात लावण्यास मनाई, चूक केल्यावर शिक्षाही मिळते

Good News: 7 तासांत पुण्यावरून बीडला पोहचा, नवीन ट्रेन सुरू; तिकीट किती अन् थांबे कुठे?

SCROLL FOR NEXT