Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यातील 5 Star हॉटेलमध्ये सुरू होत भलतंच काम; पोलीस पोहोचले अन्...

Pune 5 Star Hotel Case Exposed: पुणे स्टेशन परिसरातील एका पंच तारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

Shivani Tichkule

अक्षय बडवे

Crime in Pune: पुणे स्टेशन परिसरातील एका पंच तारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी ३ दलालांना अटक करण्यात आली आहे. रवींद्रकुमार तुलशी यादव, आनंदकुमार सुक्कर यादव, अभिषेक प्रकाशचंद बेनिवाल अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. यासोबतच दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील चार तरुणींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. (Latest Marathi News)

हे दलाल सोशल मीडियावरून (social Media) ग्राहकांच्या संपर्कात होते. पुणे स्टेशन परिसरातील फाईव्ह स्टार हाॅटेलमधील खोली बुक करून परराज्यातील तरुणींना तेथे बोलावून घेत होते. त्यानंतर ग्राहकांशी ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधून आर्थिक व्यवहार करत होते.

पुणे (Pune) स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये दलालांनी दोन खोल्या आरक्षित करुन ठेवल्या होत्या. या ठिकाणी दोन तरुणींना बोलविण्यात आले. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा येरवडा भागात आणखी दोन तरुणी आणि तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली. (Pune News)

येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातून तीन दलाल तसेच दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस (Police) ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुरातील हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय

नागपुरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) भंडाफोड केला आहे. याप्रकरणी दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एका उजबेकिस्तानच्या तरुणीसह दिल्लीच्या 2 तरुणींनीची सुटका केली आहे.

वर्धा मार्गावर सुरु असलेल्या एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय रू असल्याची गुप्त माहिती नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी या हॉटेलमध्ये सापळा रचून 2 दलालांना अटक केली.

अटक केलेल्यांमध्ये बिलाल अहमद आणि राजकुमार गडेलवार यांचा समावेश आहे. ऑनलाइन पद्धतीने हे दलाल ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना तरुणी उपलब्ध करून द्यायचे. या प्रकरणी उजबेकिस्तान येथून आलेली एक तरुणी आणि दिल्ली येथील 2 तरुणींची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEED: मॅरेथॉनसाठी हायवेवर धावण्याची प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शिक्षकांची अजब उत्तरं; VIDEO व्हायरल

Video : लोकसभेत गदारोळात मला मारहाण केली, जोरात ढकललं; महिला खासदाराचे केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप

LICची मोठी घोषणा! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरपर्यंत मिळणार विशेष सवलती

Online Gaming Regulation Bill: ऑनलाइन गेमिंगचा सरकारकडून 'गेम'; दोन्ही सभागृहात ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

SCROLL FOR NEXT