Kalyan dombivli House Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan dombivli House Price : सर्वसामान्यांना झटका; कल्याण-डोंबिवलीत घरांच्या किमती अडीच लाखांनी महागणार

Kalyan dombivli House price News : सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. कल्याण-डोंंबिवलीत घरांच्या किमती अडीच लाखांनी महागणार आहे.

Saam Tv

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली शहर मध्यमवर्गीय आणि नोकरदारवर्गांचं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरात गृहनिर्माण प्रकल्प नेहमीच तेजीत राहिला आहे. मात्र या व्यवसायात काहीशी मंदी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेडीरेकनरच्या दरात तब्बल ५.८४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. रेडीनेकर दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. घरांच्या किमतीत तब्बल दोन ते अडीच लाखांची भर पडणार आहे. घरांच्या किंमती वाढणार असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीत घर घेताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरात घरांच्या किमती कोटींच्या घरात गेल्या आहेत. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली शहरात ४० ते ७० लाखांमध्ये घरे मिळू शकतात. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत गृहनिर्माण व्यवसाय नेहमीच तेजीत राहिला आहे. त्यामुळे विकसकांनी परवडणाऱ्या घरांवर दिलेला भर होय.

विकासकांच्या संघटनेच्या अंदाजानुसार, शहरात हजारो गृहप्रकल्प सुरू आहेत. दरवर्षी प्रकल्पांची संख्या किमान एक हजारांनी वाढत आहे. शहरातील घरांची मागणी सातत्याने असल्याने पुरवठाही तसाच अव्याहत सुरू आहे. त्यामुळे शहरात घरांची खरेदी-विक्री तेजीत सुरू आहे. रेडीनेकरच्या दरात वाढ झाल्यामुळे तेजीला कुठे तरी मंदीची झळ सोसावी लागणार आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात जागेनुसार घरांच्या किमतीत तफावत आढळून येत आहे. रेल्वे स्टेशनजवळ घर खरेदी करायचं तर येथील घरांचं भाव कोटींमध्ये आहेत. घर खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी, टीडीएस आणि रजिस्ट्रेशन फी हा ग्राहक भरत असतो. रेडीरेकनरचा दर वाढल्याने घर खरेदीवर मोठा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण-डोंबिवलीत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. बेकायदा बांधकाम उभारताना कारवाई होणार नाही, याची खात्री असल्याने बांधकामे उभी राहिली आहे. या घरांची विक्री देखील झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेरा घोटाळ्यातील ६५ बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला फटकारलं. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं.

घरांवर किती परिणाम होईल?

एमसीएचआय सदस्य रवी पाटील म्हणाले, 'रेडीरेकनरचे दर वाढले आहे. त्याचा बोजा हा सर्वसामान्य ग्राहकांवर पडणार आहे. रेडीरेकनर वाढल्याने त्याचा घरांच्या विक्रीवर परिणाम दिसून येईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT