- सिद्धेश म्हात्रे
Navi Mumbai News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या क्षेत्रात प्रकल्पग्रस्तांनी दि. बा. पाटील (Dinkar Balu Patil) यांच्या नावाची पाटी लावत आजच्या क्रांतिदिनी (ता.9 ऑगस्ट) सरकराला लवकरात लवकर विमानतळाचे नामकरण करावे अन्यथा माेठं आंदाेलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी माेठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित हाेते. (Maharashtra News)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे सरकारने निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यासाठीची मान्यता देण्यात आली.
दरम्यान शासनाकडून कृती समितीला वारंवार नामकरण प्रस्ताव दिल्लीत पाठवला जाणार असल्याचे आश्वासन देण्यात येते आहे. प्रत्यक्षात कृती होताना दिसत नसल्याने आज प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक होत प्रकल्पग्रस्तांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी क्रांतीदिनी दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामफलकाचे अनावरण केले.
यावेळी सरकारने लवकरात लवकर विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर आझाद मैदानावर पायी मोर्चा काढू असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला. यावेळी रामशेठ ठाकूर (माजी खासदार) यांच्यासह प्रकल्पग्रस्त माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.