Ahmednagar Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई; प्रतिबंधात्मक आदेश लागू, नेमकं कारण काय?

साम टिव्ही ब्युरो

Ahmednagar Latest News:

अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 20 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.   (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर ठेवण्यास बंदी आहे. (Latest Marathi News)

यासोबतच दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई

तसेच आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Satellite Internet: सिमकार्डविना मिळणार नेटवर्क? आकाशातून उतरणार 'सॅटेलाइट इंटरनेट', जाणून घ्या संपूर्ण माहिती

CM Eknath Shinde: ...अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील टीकेला CM शिंदेंनी दिलं जशास तसे उत्तर

Adani Group: राज्यातील शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे? महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा विरोधकांचा आरोप

Shiv Sena Dasara Melava: उद्धव ठाकरे की, मुख्यमंत्री शिंदे? कोणाचा दसरा मेळावा ठरणार लक्षवेधी? वाचा...

SCROLL FOR NEXT