Maratha Reservation: जरांगे मुंबईच्या दिशेने, मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक; मराठा आरक्षणासंदर्भात काय घेण्यात आला निर्णय?

Cm Eknath Shinde On Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडली.
Cm Eknath Shinde On Maratha Reservation
Cm Eknath Shinde On Maratha ReservationSaam Tv
Published On

Cm Eknath Shinde On Maratha Reservation:

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडली. या बैठकीत आतापर्यंत नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तातडीने कुणबी नोंदी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cm Eknath Shinde On Maratha Reservation
Manoj Jarange: मुंबईला निघण्यापूर्वी जरांगेंनी शेवटचा डाव टाकला, सरकारची अडचण वाढणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सरकारने काढलेल्या परिपत्रकाची जिल्हा निहाय अंमलबजावणी व्हावी, अशा सूचना देण्यात आलाय आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी नोंदी सापडल्यानंतरही प्रमाणपत्र द्यायला तांत्रिक अडचणी येत आहेत, अशा ठिकाणी फेर तपासणी केली जावी, असं सांगण्यात आलं आहे.  (Latest Marathi News)

यासोबतच अनेक ठिकाणी प्रमाणपत्रांमध्ये चुका आढळल्याने त्यामध्ये नव्याने बदल करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तालुका पातळीवर नोंदणी संदर्भात शिबिर सुरू आहेत. अशा ठिकाणी गरज पडल्यास सरकार अतिरिक्त मनुष्यबळ पुरवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना निर्देश हे निर्देश दिले असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Cm Eknath Shinde On Maratha Reservation
RBI ने श्रीरामाच्या नावाने 500 रुपयांची नोट केली जारी? व्हायरल फोटोचे सत्य जाणून घ्या

या बैठकीस निवृत्त न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, आमदार बच्चू कडू, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, महसूलचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकासचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, इतर मागासवर्ग विभागाच्या सचिव अंशू सिन्हा , विधी व न्याय सचिव कलोते उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com