Pune Accident News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तेलंगणाच्या दिशेने जाणारी खासगी बस उलटली, वाहतूक ठप्प

Pune Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव हद्दीत भीषण अपघात झाला आहे

मंगेश कचरे

Pune News: पुण्यातून अपघाताचं मोठं वृत्त हाती आलं आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव हद्दीत भीषण अपघात झाला आहे. पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी खासगी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या बसमध्ये 50 ते 60 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव हद्दीत भीषण अपघात झाला आहे. पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स बस उलटल्याची घटना घडली आहे. तेलंगणाच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस उलटल्यानंतर प्रवाशामध्ये एकच खळबळ उडाली. बसमध्ये अंदाजे 50 ते 60 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मदत कार्य सुरू केले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, ढाब्याजवळ बस थांबवण्यात आली होती. ढाब्यात जेवण केल्यानंतर सर्व बसमध्ये परतले. त्यानंतर बस दुसऱ्याने चालवायला घेतली. बस खूप वेगात होती. मुंबईहून तेलंगणाला जाणारी भरधाव वेगातील ही बस उलटली. भरधाव बस प्रवाशांनी गच्च भरली होती. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही प्रवासी घटनास्थळी आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT