Narendra Modi Saam Tv
मुंबई/पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; असा असेल संपूर्ण दौरा

साधारण सकाळी १० च्या सुमारास पंतप्रधान मोदींचे पुण्यात आगमन होईल. त्यानंतर ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. आज पुणे मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या टप्प्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्याच बरोबर नदीसुधार प्रकल्पाचीही सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे. साधारण सकाळी १० च्या सुमारास पंतप्रधान मोदींचे पुण्यात आगमन होईल. त्यानंतर ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करतील.

हे देखील पहा -

त्यानंतर गरवारे इथं मेट्रोचं उद्घाटन करतील. तिथून ते मेट्रोने प्रवास करतील. त्यानंतर एमआयटी जवळ भाजप कडून सभा होणार आहे. त्यानंतर मोदी आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन करुन सिम्बॅायसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर साधारण २.३० वाजता विमानतळाकडे रवाना होणार आहेत.

दरम्यान मोदींच्या दौऱ्या आधीच पुण्यातलं राजकारण तापलं आहे. अर्धवट प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करत असल्याची टिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर आज मोदींचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आंदोलन करुन काळे झेंडे दाखवणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

SCROLL FOR NEXT