मुंबई: आज सभागृहात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत असताना उपसभापती निलम गोऱ्हे यांनी वेळ मागितला यावेळी दरेकर यांनी उपसभापतींवर जाणीवपूर्वक डावलत असल्याचा आरोप केला. सभागृहात आम्हाला जाणीपूर्वक डावलले जात असल्याचे प्रविण दरेकर म्हणाले. आम्हाला तुमच्या कामावर आक्षेप आहे. आम्ही तुमच्यावर पुन्हा एकदा अविश्वास ठराव आणू असा इशाराही दरेकर (Pravin Darekar) यांनी यावेळी दिला.
यावेळी प्रविण दरेकर यांनी अविश्वास ठराव आणू असा इशारा दिल्यानंतर अपसभापती निलम गोऱ्हे यांनी मला तुम्ही धमक्या देऊ नका, मी वेळ विचारली तर एवढा काय अन्याय केला, मला तुम्ही धमकी काय देता असही उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या.
मी सभागृहात बोलत असताना एकही मुद्दा सोडून बोललो नाही मला तुम्ही का रोखत आहे अशी विचारणा प्रविण दरेकर यांनी यावेळी केली.
मराठी शाळा कमी होत आहेत
आपण मराठी भाषेसाठी कायदा बनवतो पण त्याची अंमलबजावणी होत नाही. मुंबई (Mumbai) महापालिकेच्या शाळांना म्युन्सीपल स्कुल अशी नावं दिली जात आहेत. मराठी शाळेत शिकले म्हणून शिक्षकांना शाळेत कायस्वरूपी सेवेत घेतले जात नाही. यासाठी शिक्षकांना आंदोलन करावे लागत आहे. राज्यात मराठी शाळा (School) कमी होत आहेत. आणि उर्दू शाळा वाढत आहेत. बंद पडणाऱ्या शाळा उघडण्यासाठी सरकारने काय उपाय केले आहेत, असा सावालही प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी केला.
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.