शिवसेनेचे अर्धे मंत्रीमंडळ उपऱ्यांंनी भरलेले; प्रवीण दरेकरांचा घणाघात SaamTV
मुंबई/पुणे

शिवसेनेचे अर्धे मंत्रीमंडळ उपऱ्यांंनी भरलेले; प्रवीण दरेकरांचा घणाघात

'प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेच्या रणरागिणी आहेत का? उर्मिला मातोंडकर कोण आहेत'

सुरज सावंत

मुंबई : संजय राऊत Sanjay Raut 370 चा अभिमान असे सांगतात, जम्मू काश्मीरची (Jammu and Kashmir) चिंता राऊतांनी करू नये, मोदींमध्ये (Narendra Modi) त्याला चोख उत्तर देण्याची धमक आहे. राऊतांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत सल्ले द्यावेत तसेच राऊतांनी ड्रग्जबाबत खालच्या पातळीवर बोलू नये. कुणाचे जावई ड्रग्ज Drugs प्रकरणात पकडले गेले ते महाराष्ट्राने पाहिलं आहे. कोण कारवाईच्या बाजूने आहे, कोण विरोधात ते महाराष्ट्र पाहत असल्याचं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी पत्रकार परिषदेत राऊतांवरती टीका केली आहे. आज सामनाच्या अग्रलेखा मधून चंद्रकांत पाटलांवरती टीका केल्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी ड्रग्ज बाबत विधान केली. (Praveen Darekar has criticized Shiv Sena in the press conference.)

हे देखील पहा -

दरेकर म्हणाले 'पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत त्यांचे मत आम्ही विचारात घेऊ मात्र पंकजा ताईंपेक्षा (Pankaja Munde) शिवसेनेचे अनंत गिते, रामदास कदम (Anant Gite, Ramdas Kadam) यांच्या टिकेकडेही लक्ष द्यावे आजची शिवसेना देखील उपऱ्यांनी भरलेली आहे. उदय सामंत, अब्दुल सत्तार, उर्मिला मातोंडकर, प्रियका चतुर्वदी (Uday Samant, Abdul Sattar, Urmila Matondkar, Priyaka Chaturvedi) हे 66 च्या शिवसेनेचे आहेत का ? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला.

शिवसेनेचे अर्धमंत्री मंडळ उपऱ्यांचे -

तुमच्या पक्षात असलेल्या उपऱ्यांची संख्या आणि भाजपमधील उपऱ्यांची आकडेवारी आपण महाराष्ट्राला द्यावी. प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेच्या रणरागिणी आहेत का? उर्मिला मातोंडकर कोण आहेत. आज शिवसेनेचे अर्धमंत्री मंडळ उपऱ्यांचे आहे. पंढरपूरला समाधान आवताडे यांना आपण तिकिट दिले नाही त्यांना आम्ही आमदार करून निवडून आणले आहे तुमच्या पक्षात ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना आम्ही न्याय देतो असं दरेकर म्हणाले

दरम्यान 100 कोटींची वसुली, महिला अत्याचार, भ्रष्टाचार यामुळे लोकांचे आज डोळे फिरलेले आहेत. आता दिलेले 10 हजार कोटींपैकी लोकांना कसे आणि किती मिळणार हे सांगावे त्यामुळे लोकांचे डोळे दिपतील अशी टीका ही दरेकर यांनी शिवसेनेवरती केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Food Delivery Scam : संतापजनक! ऑनलाईन मागवलेल्या अंड्यांमध्ये आढळल्या अळ्या, विरारमध्ये नेमकं काय घडलं?

PCOS vs Thyroid Test: पीसीओएस की थायरॉइड समस्या? 'या' चाचण्यांच्या माध्यमातून समजू शकतो फरक

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Wikipedia ला टक्कर देणार 'हे' नवं सॉफ्टवेअर, एलोन मस्कची घोषणा

Navneet Rana: 'तुझ्यावर मुलासमोर बलात्कार करु...'; नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT