Prasad Lad  Saam Tv
मुंबई/पुणे

Prasad Lad: या कारवाईनंतर खरं-खोटं सगळं बाहेर येईल, राहुल कनाल प्रकरणावर प्रसाद लाड यांची टीका

महाराष्ट्र झुकावा ही आमची इच्छा नाही. या कारवाईनंतर खरं-खोटं सगळं बाहेर येईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. यावरुन आता जोरदार टीका होऊ लागली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर त्याला भाजपने देखील उत्तर दिले आहे (Prasad Lad Reaction On Rahul Kanal IT Raid Case).

महाराष्ट्र झुकावा ही आमची इच्छा नाही - प्रसाद लाड

"महाराष्ट्र झुकावा ही आमची इच्छा नाही. या कारवाईनंतर खरं-खोटं सगळं बाहेर येईल. सत्य असेल तर ते बाहेर येईल. कुणा एकासाठी महाराष्ट्र बदनाम होतो, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहेत, म्हणून कारवाई होते, या आरोपात तथ्य नाही. आयकर विभागाची कारवाई चौकशी करुन होत असते", अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दिली आहे.

राहुल कनालच्या घरी आयकर विभागाची धाड

आज सकाळीच आयकर विभागाचे (Income Tax Department) एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले. त्यांनी छापेमारीस सुरु केली. यावेळी त्यांच्या घराबाहेर केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या परिसरातील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी घराची झाडाझडती सुरू केली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयंकर कृत्य, महापालिका आवारात महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला अन्...

10 नोव्हेंबरनंतर मोठा राजकीय भूकंप? पटेल-पवारांच्या भेटीत विलिनीकरणाची तारीख ठरली?

Diwali For Diabetes Patient: डायबिटीजच्या रूग्णांनी दिवाळीचा फराळ खावा की नाही? रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम

Pune News: सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडाल तर खबरदार, पुणे महानगरपालिकेकडून नियमावली जारी

अखेर गोकुळचा अध्यादेश निघाला; सरकारच्या 4 संचालकांची नेमणूक|VIDEO

SCROLL FOR NEXT