पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक; 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक; 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे : पुण्यातील Pune प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची पाच कोटींची 5 Crores फसवणूक केल्याप्रकरणी अटकेची Arrest कारवाई करण्यात आली आहे. ग्राहक गुंतवणूकदारांना मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे बोलून अमिष दाखवत प्रणव मराठे यांनी फसवणूक केली. तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणूक Fraud केल्याप्रकरणी मराठे ज्वेलर्सचे माजी भागीदार Partner प्रणव मराठे यांना पुण्याच्या कोथरुड Kothrud पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हे देखील पहा-

प्रणव मराठे यांनी एकूण 18 गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अटक केल्यानंतर न्यायालयात Court हजर केले असता, त्यांना न्यायालयाने 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी Custody सुनावण्यात आली.

शुभांगी काटे (वय 59, रा. कोथरूड) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. मराठे ज्वेलर्समार्फत Jwellers सोने, चांदी आणि मूळ रकमेवर जादा परतावा Refund मिळेल असे आमिष गुंतवणूकदारांना त्यांच्याकडून दाखवण्यात आले होते. यामुळे विश्वासाने अनेक नागरिकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवले होते, पण बरेच दिवस होऊनदेखील त्यांचे पैसे त्यांना मिळाले नाहीत.

शुभांगी काटे यांनी याबाबत ज्वेलर्स व्यवस्थापनाकडे विचारणा केली तरीही त्यांना कोणत्याही प्रकाराची माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर शुभागी यांनी मराठे ज्वेलर्सच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्या तक्रारींनुसार प्रणव मराठे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीवरून अधिक तपास करण्यात आला आणि उलघडा झाला की, तब्बल 18 गुंतवणूकदारांची तब्बल 5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रूपयांची फसवणूक झाली आहे. या सर्व गुंतवणुकदारांचे पैसे प्रणव यांनी स्वतः फायद्यासाठी वापरल्याची माहिती मिळाली आहे. पुराव्यांच्या आधारे प्रणव मराठेला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयात हजर केलं असता 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

SCROLL FOR NEXT